राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती होईपर्यंत चव्हाण यांच्यावर ही विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.






भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीन महत्त्वपूर्ण समित्यांची घोषणा आज केली. यामध्ये प्रदेश संघटनपर्व समिती, प्रदेश अनुशासन समिती, प्रदेश सक्रिय सदस्यता अभियान यांचा समावेश आहे. या तीनही समित्यांच्या प्रमुखांची पत्रे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून जारी करण्यात आले आहेत.
1) प्रदेश संघटनपर्व समिती चे प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा केली. भाजपाच्या संघटनात्मक बांधणीचे नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबरपासून संघटनपर्व सुरू करण्यात आले आहे. या पर्वाची सुरुवात नागपूर येथून कऱण्यात आली.
2) प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार प्रा अनिल सोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीत छ.संभाजीनगरचे किशोर शितोळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, मुंबईचे माजी आमदार अतुल शाह व पुणे येथील योगेश गोगावले यांना सदस्य म्हणून नियुक्त केले.
3) प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाची देखील घोषणा केली. अभियानाचे प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे (पुणे) व बीड येथील प्रवीण घुगे यांची अभियान सहप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.










