पुण्यात उष्णतेचा कहर! १२८ वर्षांतील सर्वोच्च तापमानच्या विक्रमाला मागे टाकले, राज्यातील सर्वाधिक तापमानाची या शहरात नोंद

0

राज्यात उन्हाचा चटका वाढला असून प्रचंड उकाडा वाढला असून नागरिकांना घराबाहेर पडणं अशक्य वाटू लागले आहे, रविवारी पुणे शहरात राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून पुण्याने विदर्भालाही मागे टाकले आहे. यामुळे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत शहरात फिरणे अवघड झाले आहे.

पुणे शहरातील लोहगाव परिसरात ४२.८ अंश तापमानाची नोंद झाली असून लोहगाव सह इतर परिसरात ४०.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात उन्हाचा चटका कायम आहे. काल अकोला, वाशिम मध्ये पारा ४२.४ अंशावर पोहोचला होता. तर वर्धा, यवतमाळ नागपूर मध्ये सुद्धा उन्हाळा कायम असून ३९ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मराठवाड्यात परभणी मध्ये ४२.४, बीड मध्ये ४१.९, धाराशिव मध्ये ४१.८ अंश तापमानाची नोंद झाली असून उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचे चित्र पाहता मालेगाव मध्ये ४२.४ अंश, जळगाव, ४२.३, सोलापूरमध्ये ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

१२८ वर्षांतील सर्वोच्च तापमान

पुण्यात चार दिवसांपूर्वी तामानाने उच्चांक गाठला होता. पुणे शहराचा पारा २३ एप्रिल रोजी ४३.६ अंश सेल्सिअस इतक्या विक्रमी तापमानावर गेला होता. या तापमानाने १२८ वर्षांतील कमाल तापमानाच्या विक्रमाला मागे टाकले होते. ३० एप्रिल १८९७ रोजी शहराचे तापमान ४३.३ अंशांवर होते. एप्रिलमधील मागील १२८ वर्षांतील हे सर्वोच्च तापमान होते. शहरात एप्रिल महिन्यात यंदा लोहगावचे तापमान सलग पाचव्या दिवशी ४३ अंशावर गेले होते.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार