‘अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत’, भाऊ कदम यांनी व्यक्त केला विश्वास, म्हणाले विकास…

0

मराठी कॉमेडी किंग भाऊ कदम हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रचारक आहेत. ते यावेळी पिंपरी महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा प्रचार करण्यासाठी पोहोचले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य भाऊ कदम यांनी केलं आहे.

महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांनी मंगळवारी चिंचवड परिसरातील रामनगर, शंकर नगर, दत्तनगर अशा वेगवेगळ्या परिसरांमध्ये पदयात्रा काढली होती. या पदयात्रेमध्ये महाराष्ट्राचे लाडके कलाकार चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम यांनी यांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण परिसरात त्यांनी जाऊन जनतेशी संवाद देखील साधला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

‘अजित पवार मुख्यमंत्री झालेच पाहिजेत’

पुण्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे हे महायुतीचे उमेदवार आहेत. पिंपरी मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा समाना रंगणार आहे. सध्या दोन्ही नेत्यांकडून आपल्या मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन देखील केलं जात आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचा प्रचार करण्यासाठी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर मंगळवारी महाराष्ट्राचे लाडके विनोदी कलाकार भाऊ कदम यांनी देखील अण्णा बनसोडे यांचा प्रचार करण्यासाठी उपस्थिती दाखवली होती. भाऊ कदम हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्टार प्रचारक आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

दरम्यान, यावेळी प्रचार करत असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी भाऊ कदम म्हणाले की, मतदारसंघात अण्णा बनसोडे यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अजित पवारांचे वाक्य आहे. ते नेहमी म्हणत असतात की, लई हयगय करायची नाही आणि दिलेला शब्द टाळायचा नाही. त्यानंतर त्यांना पुढचा मुख्यमंत्री अजित पवार होतील का? असा प्रश्न विचारला असता, भाऊ कदम म्हणाले की, विकास पुरुष म्हणून अजित पवार यांना ओळखलं जातं. त्यामुळे ते मुख्यमंत्री होतील. असं विश्वास भाऊ कदम यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

पिंपरी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सामना रंगताना पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांना आमदार अण्णा बनसोडे यांचं आव्हान असणार आहे. मतदार संघात अण्णा बनसोडे यांना मोठ्या प्रतिसाद मिळत आहे.