राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार, पक्षांतर्गत धुसफूस आणि मराठा आरक्षणावरही देवेंद्र फडणवीस कडाडले

0

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांनी खोटा नरेटिव्ह पसरवला. पण विधानपरिषद निवडणुकीत त्यांचा (वीस आमदार फोडून) फुगा फुटला आहे. महाराष्ट्रामध्ये विरोधकांच्या वतीने सुरू असलेल्या आरक्षणाचे राजकारण हे समाज हितासाठी धोक्याच असून समाजामध्ये वाढत जाणारी दूही ही पिढीनं पिढ्या मिटत नाही याची जाणीव ठेवली पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आदेशाविना यंत्रणा थंड पडत आहे आणि ही धोक्याची घटना आहे परंतु आज मी ठामपणे सांगतो, विरोधकांना जागीच खेचण्याचं काम केलं पाहिजे! आदेशाची वाट पाहत भारतीय जनता पक्ष शांत राहत असल्यामुळे विरोधकांचे फावत आहे. की आजची तारीख लिहून ठेवा. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार येणार, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते पुणे येथील भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज भाजपचे महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील नेते तसेच मंत्र्यांची उपस्थिती आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे, यांच्यासह भाजपच्या राज्यातील नेत्यांची देखील अधिवेशनाला प्रमुख उपस्थिती आहे.

अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला, फडणवीस म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोटा प्रचार केला. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत त्यांच्या खोट्या नरेटिव्हचा फुगा फुटला आहे. मी आज कार्यकर्त्यांना सांगतो, की तुम्ही आजची तारीख लिहून ठेवा. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे”.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता चातुर्मास सुरू होतो आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की, चातुर्मास म्हणजे तपश्चर्या मास असतो. संपर्क, संवाद आणि तपश्चर्या याकरता चातुर्मासाचा उपयोग करायचा असतो. आपल्यालाही संपर्काचा चातुर्मास साजरा करायचा आहे. आपण २०१३ रोजी पुण्यातील याच ठिकाणी घेतलं होतं. त्यानंतर २०१४ रोजी आपलं सरकार आलं होतं”.

“आताही आपण याच ठिकाणी अधिवेशन घेत आहोत आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचेच सरकार येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाची सीमा वाढवली. पण विरोधकांनी एक खोटा नॅरेटीव्ह तयार केला की, हे निवडून आले तर आरक्षण रद्द करणार”

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

“खोटं फार काळ टिकत नाही. खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम केलंय. हे म्हणत होते की, महायुतीचे आमदार फुटणार अरे तुमचे २० कधी फुटले हे तुम्हाला कळले नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला”.