पर्वती मतदारसंघात गुन्हेगारीला कोण खतपाणी घालतो ?

0

पुणे (प्रतिनिधी) : महाविकास आघडीचा जाहीरनाम्यातील सर्व आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असून आरोग्य विमा पासून लाडकी बहीण योजना मोठी वाढ देण्यासाठी बदल घडवा.गेली १५ वर्ष विद्यमान आमदारांची एक हानी सत्ता असतानासुद्धा एक तरी काम पर्वती मतदारसंघात दाखवा. जनता वसाहत् मधील सर्व स्थानिक मंडळी आणि पर्वतीकर मायबाप जनता सोबत असल्याने आपल्या पर्वतीच्या कन्येला विधानसभेत पाठवायचे आहे. महिला आमदार असून 15 वर्षात एकही महिलांच्या सबलीकरणासाठी काम नाही. या भागातील गुन्हेगारीला कोण खतपाणी घालतो ? असा सवाल संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी विचारत पर्वतीकरांना बदल घडविण्याचे आवाहन केले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

 

पर्वती विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली सुरवात व्हीआयटी हॉस्टेल चौक पासून सुरवात होऊन भव्य सभा राम मंदिर चौक जनता वसाहत याठिकाणी संपन्न झाली. यावेळी प्रमूख मार्गदर्शक संसदरत्न डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. छावा स्वराज्य सामाजिक संस्था, आरपीआय (आंबेडकर), महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटना तसेच अपक्ष उमेदवार रविंद्र क्षीरसागर यांनी मताचे विभाजन होऊन दुर्वीकरण होऊ नये यासाठी जाहीर पाठिंबा जाहीर केला.

 

यावेळी माजी नगरसेवकअशोक हरणवळ,राहुल तूपेरे, सतीश पावर, सौरभ माने,सचिन जोगदंड, निलेश भाऊ पवार, सुरज लोखंडे, प्रदीप शिवशरण, संतोष पिसाळ, मोहन पासलकर प्रविण चव्हाण, सुभाष झेंडे, प्रविण दादा चव्हाण, शिवसैनिक सुनिल शिंदे,समिर पवार, रोहित माळी, संदीप काळे, गणेश काळे, अमोल कानडे, आयाज शेख, मंगेश तावरे,सिद्दी पवार,अल्पना मोरे, वैशाली दारवटकर आदी मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी मोठ्या संख्येने महाविकास आघाडी व इंडिया फ्रंट चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महिला आणि नागरिकांची संख्या लक्षणीय होती.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

 

कदम म्हणाल्या, या प्रचाराच्या रणधुमाळीत पर्वतीकरांनी प्रचंड प्रेम आणि पाठिंबा दाखवला. एवढा जनसमुदाय पाठिशी असल्यावर पर्वतीत बदल नक्कीच घडणार याची आज पुन्हा खात्री झाली. र्वती विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधताना माझे कार्यकर्ते आणि माझे पर्वतीकर नागरिक हेच माझा अभिमान आहेत. एक स्त्री म्हणून जनतेच्या भावना समजून घेण्यात मला कसलीही अडचण येत नाही. त्यांच्या पाठिंब्यावरच मी इथपर्यंतचा प्रवास केला आहे. या पुढील काळातही त्यांचा भक्कम पाठिंबा मला विजयी करणयात महत्वाची भूमिका बजावेल आणि त्या पाठिंब्याच्या बळावरच जिंकणार असा विश्र्वास कदम यांनी व्यक्त केला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती