आमदार भीमराव तापकीर यांना वडगाव बुद्रुक, सन सिटी, आणि सिंहगड रोड परिसरात नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

विकासकामांच्या जोरावरच विजयाचा ठाम विश्वास सनसिटी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

0

महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील वडगाव बुद्रुक, सन सिटी, आणि सिंहगड रोड परिसरात भव्य प्रचार दौरा केला. या दौऱ्यात नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि अण्णांच्या नेतृत्वावरचा ठाम विश्वास स्पष्ट दिसून आला.

“गेल्या तीन टर्ममध्ये खडकवासला मतदारसंघात आम्ही केलेल्या विकासकामांवर नागरिकांचा विश्वास आहे. मतदार हा सुज्ञ आहे, तो भुलथापांना किंवा कोणत्याही गैरमार्गाने आकर्षित करण्याच्या प्रयत्नांना बळी पडणार नाही. खडकवासल्याच्या जनतेशी माझी असलेली नाळ हीच माझ्या विजयाची ताकद आहे,” असे आमदार तापकीर यांनी सांगितले.

या प्रचार दौऱ्यात मा. नगरसेवक हरिदास चरवड, हेमंत दांगट, अनंत दांगट, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या महिला अध्यक्षा डांगी ताई, स्वीकृत सदस्य गंगाधर भडावळे, शहाजी वांजळे आणि महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

सन सिटी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:

सन सिटी परिसरातील नागरिकांनी आमदार तापकीर यांच्या नेतृत्वाचे खुलेपणाने कौतुक केले. “अण्णांनी नेहमीच प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवल्या आहेत. त्यामुळे विकासकामांवर आधारित मत देणे, हा आमचा ठाम निर्णय आहे,” असे नागरिकांनी नमूद केले.

विकासाच्या वचनावर विजयाची हमी: भिमराव तापकीर

खडकवासल्यातील रस्ते सुधारणा, मेट्रो, पुल, पर्यटन विकास, पाणीपुरवठा, कर आकारणी, समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास, विद्युत विषयक कामे, या प्रकल्पांमुळे मतदारसंघाची ओळख बदलली आहे. विरोधकांचा गैरमार्गाने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. खडकवासल्यातील सुज्ञ मतदार अशा भुलथापांना बळी पडणार नाहीत, असे नागरिकांनी ठामपणे सांगितले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन