आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी अलंकापूरी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. याच वारकऱ्यांच्या टाळ मृदुंगाच्या गजरात आज पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. तर पायी प्रवास करुन 28 जूनला पालखी पंढरपूरमध्ये पोहोचेल आणि 29 जूनला संत ज्ञानेश्वर माऊलींची विठुरायांशी भेट घडेल. वारकरी संप्रदायाला याच क्षणाची आस लागलेली असते. देवस्थानने त्याच पायी वारीची घोषणा केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यंदा पालखी सोहळ्याचे 338 वे वर्ष आहे. या पालखी सोहळ्याची हजारो विठ्ठल भक्त प्रतिक्षा करत असतात.
कसा असेल दिनक्रम?
पहाटे 4 वाजता – घंटानाद
पहाटे 4:15 वाजता – काकड आरती
पहाटे 4 :15 ते 5: 30 वाजता – पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधारती
सकाळी 5 ते 9 वाजता – श्रींच्या चलपादुकांवर भक्तांची महापूजा
सकाळी 6 ते 12 वाजता – भाविकांना श्रींचे समाधी स्पर्श दर्शन, किर्तन, विणामंडप
दुपारी 12 ते 12:30 वाजता – गाभारा स्वच्छता, समाधीवर पाणी घालणे आणि महानैवेद्य
दुपारी 12:1 वाजता – भाविकांना समाधीचं दर्शन
सायंकाळी 4 वाजता – पालखीचं प्रस्थान होईल
कसा असेल आषाढी वारी पालखी सोहळा?
सोहळ्यात श्रींचा पालखी सोहळा पुण्यनगरीत दोन दिवस पाहुणचार घेत 14 जूनला सासवड मुक्कामास दिवे घाटातून हरिनाम गजरात मार्गस्थ होईल. 14 आणि 15 जूनला सासवड मुक्काम करेल. 16 जूनला जेजुरीकडे प्रस्थान, 17 जूनला जेजुरीला मुक्कामी असेल. 18 जूनला लोणंद येथे सोहळा विसावेल.
19 जूनला अधिक एक दिवसाचा मुक्काम आणि 20 जूनला तरडगाव, 21 जूनला फलटणकडे प्रस्थान करेल. 22 जूनला पालखीचा फलटणमध्ये मुक्काम असेल. 23 जूनला नातेपुते, 24 जूनला माळशिरस मुक्काम, 25 जूनला वेळापूर, 26 जूनला भंडी शेगाव, 27 जूनला वाखरी, 28 जूनला पंढरपूर, 29 जूनला आषाढी एकादशी सोहळा साजरा होईल.
पालखी सोहळ्यात फलटण येथे 21 जून, बरड येथे 22 जूनला एक दिवसांच्या मुक्कामासाठी सोहळा विसावणार आहे. 21 जूनला फलटणकडे प्रस्थान आणि मुक्काम होईल. 22 जूनला बरड मुक्काम असेल.