नाशिकमध्ये शिंदे गटात दोन पदाधिकाऱ्यांची ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; ..हकालपट्टीचे पत्रकही प्रसिद्धीस

0
1

राज्यातील सतासंघर्षानंतर मंत्रीपद आणि स्थानिक नियुक्तांवरुन निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही, मंत्रीमंडळ विस्तारापासून ते स्थानिक पातळीवरील नियुक्तांवरुन शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर येत आहे. असाच एक प्रकार नाशिकमध्ये घडला. पक्षाच्या महिला नेत्यांची आधी पक्षाच्या बैठकीत आणि नंतर थेट पोलीस ठाण्यात शिविगाळ आणि झटापटीच्या प्रकरणाने शिंदे गट चांगलाच चर्चेत आला आहे. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्याने नेते अस्वस्थ झाले आहेत. दरम्यान या प्रकरणी पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी रात्री उशीरा शोभा मगर आणि लक्ष्मी ताठे यांची पक्षाची शिस्त मोडल्याने हकालपट्टी केल्याचे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. हकालपट्टी केल्याने या महिला अडचणीत आल्या आहेत.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

नेमक काय झालं?…

नाशिकच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेल्याची घटना घडली. शिवसेनेचे राज्य सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांडक सर्कल येथील शासकीय विश्रामगृह येथे पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती.

यावेळी महिला पदाधिकारी शोभा मगर आणि लक्ष्मी ताठे या दोन महिला पदाधिकाऱ्यांमध्ये पद वाटप करण्यावरून शाब्दिक बाचाबाची होऊन, शोभा मगर यांनी लक्ष्मी ताठे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर लक्ष्मी ताठे या मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी आल्या असता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी शोभा मगर आणि त्यांचा मुलगा धीरज मगर यांनी पोलीस स्टेशनमध्येच हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लक्ष्मी ताठे यांनी केला होता. तसेच धीरज मगर यांनी साडी सोडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केल्याचा देखील आरोप लक्ष्मी ताठे यांनी केला आहे.या प्रकरणी ॲट्रॉसिटीची तक्रार दाखल करणार असल्याची माहिती ताठे यांनी दिली.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

दरम्यान याप्रकरणी शोभा मगर यांनी आपल्याला तक्रार बाबत कुठलीही कल्पना नसल्याची प्रतिक्रिया दिली. ही घटना पक्ष नेत्यांसमोर घडली. त्यामुळे मी काय बोलले, हे सगळ्यांना माहीत आहे, असे स्पष्टीकरण शोभा मगर यांनी दिले.

याबाबत रात्री उशीरापर्यंत ताठे यांच्या समर्थनार्थ समाजाचे नेते व कार्यकर्ते मुंबई नाका पोलीस ठाण्यात जमले होते. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा यासाठी ताठे व त्यांचे समर्थक आग्रही होते. एकंदरच शिवसेनेच्या शिंदे गटातील वादाने शहरात चर्चेला नवा विषय मिळाला आहे.