भोर वेल्हा मुळशीच्या रिंगणात हिंदुत्ववादी वेगळा ‘पॅटर्न’चर्चेत? जनआशीर्वादाचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील

0
1

भोर : भोर वेल्हा मुळशीच्या विधानसभा निवडणुक रणधुमाळीला सुरुवात झाली आणि घराणेशाहीच्या दबावात फासे असे पडले कि, गेली तीन वर्ष हिंदुत्ववादी विचाराने शेतकऱ्यांचे हितासाठी दिवसरात्र काम करणाऱ्या किरण दगडे पाटील या तरुण नेतृत्वाच्या पदरी अपक्ष निवडणूक लढवण्याची वेळ आली. भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्यांदाच घराणेशाही आणि कुरगुडीच्या राजकारणापासून जनतेला मुक्त करत ‘विकासाचा किरणोदय’ करण्याचा संकल्प जन-आशीर्वाद दौऱ्यामध्ये केले जात असतानाच कातडी बचाव राजकारणी चांडाळ चौकडीने एकत्र येत सक्षम उमेदवार नसतानाही भारतीय जनता पक्षाच्या विजयी तयारीचा धसका घेत मतदार संघ खेचून घेण्याचं काम केलं. भोर वेल्हा अन् मुळशी या तीनही तालुक्यांमध्ये सर्वांगीण आणि साचेबंद विकास साधण्यासाठी एक ड्रीम मॉडेलही तयार करण्यात आलं होतं परंतु या चांडाळ चौकटींनी डाव साधत या होतकरू तरुणांना एकाकी पाडण्याचं काम केलं असलं तरीही जन-आशीर्वादाचा प्रचंड आग्रह आणि मातीशी प्रतारणा करणे शक्य नसल्यामुळे भव्य दिव्य जना आशीर्वादात भोर वेल्हा मुळशी मध्ये वेगळा ‘पॅटर्न’सुरू झाला असून गुलाल उधळण करून संपूर्ण महाराष्ट्र मध्ये या जननायक यज्ञाची चर्चा होणारच अशी आशा जनआशीर्वादाचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील यांनी प्रचाराचा शुभारंभ करताना व्यक्त केली.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

भोर वेल्हा मुळशी मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून घराणेशाही लोकांनी या मतदारसंघावर आपला हेतू साध्य करण्यासाठी कधीही जननायक आणि जनतेचे प्रतिनिधित्व करणारे नेतृत्व उदयास येऊ दिले नाही. महायुतीच्या धर्मामुळे कायम या मतदारसंघांमध्ये शिवसेना या पक्षाने निवडणूक लढवण्याचे काम केलं आहे. 2009 साली महायुतीकडून शिवसेनेच्या तिकिटावर पराभूत झालेल्या उमेदवारालाच 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाने आयात करून उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेला या मतदारसंघांमध्ये वारंवार संधी देण्यात आली परंतु घराणेशाहीच्या विरोधात लढण्यास शिवसैनिक सक्षम नाही याची जाणीव तालुक्याला झालेली असतानाच भारतीय जनता पक्षातील तरुण नेतृत्वाने बोरवेलला विधानसभा मतदारसंघ लढण्यासाठी दोन वर्षांपूर्वी या भागातून रणसिंग फुगलं. आणि हिंदुत्ववादी विचाराला एक हक्काचा आधार मिळाला. तीनही तालुक्यांमध्ये या हिंदुत्ववादी युवा नेतृत्वाचे जंगी स्वागत होण्यासही सुरुवात झाली. यंदा परिवर्तन नक्कीच होणारं अशी आशा सर्वसामान्य मतदारांना वाटत असतानाच माशी शिंकली अन घराणेशाही राजकारणांनी चांडाळ चौकटीच्या साक्षीने जननायकावरती डाव साधला! पुन्हा आयात उमेदवार अन पक्ष बदलही!

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या विद्यमान संग्राम थोपटे यांना उमेदवारी मिळाली अन् शिवसेना(उबाठा)पक्षाचे जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या पक्षाकडून घड्याळ चिन्हावर उमेदवारी देण्यात आल्याने दोन्ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्ववादी मतदार मोठ्या प्रमाणावर नाराज झाले असून आपल्या विचारावर आघात करणाऱ्या या घराणेशाहीच्या कटकारस्थानाला शह देण्याचा संकल्प करत हा जनसमुदाय एकवटला आहे. घराणे शाळेतील मुरब्बी राजकारण्याने विरोधातील लढत आणि हिंदुत्ववादी विचारांमध्ये फूट पाडण्यासाठी महायुतीचे बंडखोर उमेदवार कुलदीप कोंडे यांना बळ देण्याचे काम केले असले तरीही भाजपाचे बंडखोर उमेदवार किरण दगडे यांच्या पाठीमागे जनसमुदायाचा रेटा वाढत आहे याची जाणीव प्रचार शुभारंभाच्या दिवशी दिसली आहे. गाव गाड्यांच्या राजकारणात मश्गुल असलेल्या या राजकारण्यांनी जनआशीर्वादाचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील यांच्यासाठी व्यूहरचना केली असली तरी प्रगल्भ हिंदुत्वाच्या जोरावर सर्वांगीण विकासाची आखणी केलेल्या या नेतृत्वासाठी जनसमुदायाचा पाठिंबा वाढत असल्याचे चित्रं मतदार संघात दिसत आहे.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

भोर वेल्हा मुळशी मतदारसंघांमध्ये घराणेशाहीच्या संग्राम थोपटे या उमेदवाराने हेतू साध्य करण्याचे तंत्र यावेळीही यशस्वी करण्याचे मनसुबे आखत प्रचंड रोष असलेल्या मुळशी तालुक्यामध्ये विरोधकांची आयात उमेदवाराला उमेदवारी दिली. महाविकास आघाडीचा धर्म परंपरागत विरोधक शिवसैनिकांच्या पचनी पडत उद्धव ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देत भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला बसलेल्या या गद्दार सैनिकाच्या विरोधात भोर वेल्हा मुळशी विधानसभा मतदार संघातील शिवसैनिक दुहेरी नाराज झाला आहे असून हा मतदार राजकीय भूमिका काय घेणार यावरच निर्णायक लढती ठरणार आहेत.