मुळशी ‘चांडाळ चौकडी’चा करेक्ट कार्यक्रम अन् विजयाचा नवा पॅटर्न; तालुक्याच्या विकासासाठी दोन हिंदू धर्मसेवक रणांगणात

0

भोर वेल्हा मुळशी या तीनही तालुक्याचा रखडलेला विकास आणि घराणेशाहीच्या वळचणीला असलेल्या चांडाळ चौकडीमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ‘मील बाट के खावो’ या चंगळवादी लोकांच्या हातामध्ये तालुक्याची सूत्रे जातात की काय अशी भीती असतानाच हिंदुत्ववादी विचाराच्या घडणीत कसून तयार झालेल्या किरण दगडे, प्रवीण तरडे या दोन नवख्या तरुणांनी मुळशी ‘चांडाळ चौकटी’चा करेक्ट कार्यक्रम करण्याचा संकल्प करत जन आशीर्वादाचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील यांच्यासाठी विजयाचा नवा पॅटर्न बनवण्यासाठी वाटचाल चालू केली आहे. मुळशी तालुक्याच्या विकासासाठी हे दोन हिंदू धर्मसेवक एकत्र फार पूर्वीपासून काम करत आहेत याची सुरुवात झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ‘मुळशी पॅटर्न’ शेतकरी जाणिवेचा निर्माण झाला. शेतकऱ्यांवर चित्रपट काढण्यासाठी मदतीला धावलेला पहिला माणूस किरण दगडेच. तो केवळ आशेचा नाही तर भविष्याचा किरण असून जनहितवादी विचार, सामाजिक बांधलकीच्या भावनेचा यंदा भोर, राजगड, मुळशी विधानसभेत ‘किरण दगडे पॅटर्न’ चालणार, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे दारोदारी जाऊन व्यक्त करत आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

रायरेश्वराचे दर्शन घेऊन भाजपचे माजी नगरसेवक किरण दगडे यांनी बबनराव दगडे, गोविंद रणपिसे यासह भोर, राजगड, मुळशीतील किरण दगडे समर्थकांच्या उपस्थित प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर भोर येथेच ‘व्यक्ती फिक्स, किटली फिक्स आणि कामही फ्रेश’ असा एल्गार करत घराणेशाहीच्या वळचणीला असलेल्या चांडाळ चौकटींना जनता इटली असून विकासाची किटली विजयी होणार असा विश्वासही प्रवीण तरडे यांनी यावेळी व्यक्त केला. गेली तीन वर्षे आपण एक कुटुंब म्हणून तालुक्यासाठी सुखदुःखात झटत आहोत ही प्रचाराची नाही तर कुटुंबाची सभा असून, आता तुमच्या आशिर्वादावर या घराणेशाहीच्या वळचणीला असलेल्या चांडाळ चौकडीचा करेक्ट कार्यक्रम करू असे आवाहन करून तुम्ही माझ्यासाठी एक दिवस उभे रहा, मी तुमच्यासाठी आयुष्यभर उभा राहील या वचन बद्धतेत जना आशीर्वादाचे अधिकृत उमेदवार किरण दगडे पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची सुरुवात भोर, राजगड याच तालुक्यातून केली. आज या तालुक्यांची अवस्था? दोन पिढ्यांच्या घराणेशाही पेक्षा शिवराज्य खूप मोठे असून त्यासाठी आपण एकत्र येण्याचे आवाहन करत परिवर्तनाची वेळ झाली आहे याची जाणीव मतदारांना करून दिली. ज्या रायरेश्वरावर आज प्रचाराचा नारळ फोडला ते मंदिर जागतिक तीर्थ क्षेत्र बनवण्याचे माझे स्वप्न असून ते पूर्ण करणार. तसेच तरूणांना तालुक्यातच रोजगार मिळावा यासाठी एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावणार. मुलांसाठी क्रीडा संकुल, मुलींच्या विवाहासाठी आणि महिला बचत गटासाठी मोफत कार्यालय, रस्त्यांचे प्रश्न, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे प्रश्न प्रामुख्याने सोडवले जातील असे आश्वासनही यावेळी मतदारांना देण्यात आले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा