बावधन ते जहू जाणारे हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना; दोन पायलट एक अभियंता मृत्यूमुखी

0

बावधन परिसरातील केके राव डोंगराळ भागामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बावधन परिसरातील केके राव डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हे हेलिकॉप्टर कुठून कुठे जात होते, त्यामध्ये कोण प्रवास करत होते? या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत.

पिंपरी -चिंचवडच्या बावधन बुद्रुक परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळले. दाट धुक्यांमुळे डोंगराळ भागामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगितले जात आहे. हेलिकॉप्टर कोसळल्याची ही महिनाभरातील दुसरी घटना आहे. पुणे पोलिसांकडून याचा तपास केला जात आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा