विधानसभेत 100% पाडायचं? 50 जणांची यादी तयार; मनोज जरांगेंच्या आधी यांनी उमेदवारांची नावं सांगितली!

0

पुणे: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज आहे, सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच 50 उमेदवार कोणते पाडायचे हे अमाचे ठरले आहे. उमेदवारांची यादी तयार आहे, असंही यावेळी हाके यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले हाके? 

विदर्भातील ओबीसी नेत्यांना विनंती आहे की हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर बाबतीतून ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री घालवतील. ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज आहे. सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही. मी ओबीसीचा आवाज बनण्याचा प्रयत्न करत आहे. ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे यासाठी प्रयत्न करतोय असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पुढे बोलताना ते म्हणाले की, 50 उमेदवार कोणते पाडायचे हे आमचं ठरलं आहे. 50 उमेदवारांची यादी तयार आहे. ज्यांनी जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली त्यांना आम्ही पाडणार. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत दिसणार. त्यासाठी लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढेल असा इशाराही यावेळी लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण गेले आहे, कोर्टात प्रकरण सुरू आहे. आरक्षण म्हणजे पुढच्या पिढीचे भले होणार असे नाही, प्रत्येक घरात कलेक्टर होणार असे नाही. आरक्षण रेशनचे दुकान नाही. आरक्षणाची पॉलिसी समजून घ्यावी, असंही यावेळी हाके यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार