पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी भाजपचे कार्यकर्ते चांगलचे सक्रीय झाले संपूर्ण कोथरूड मतदार संघात घराघरात पोहोचत भारतीय जनता पक्षाची सलग तिसरा विजय साकार करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत असताना कोथरूड मतदारसंघात कोल्हापूर गादीचे छत्रपती शाहू महाराजांचा एक व्हिडिओ सध्या मतदारसंघांमध्ये तुफान वायरल होत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा संदर्भ या व्हिडिओमध्ये करण्यात आल्यामुळे या व्हिडिओला मतदानाच्या अगोदर महत्त्व प्राप्त झाले आहे. मूळचे कोल्हापूर वाशी असलेले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील कोथरूड विधानसभा निवडणूक लढत असतानाही कोल्हापूरच्या गादीचा आलेला आदेश महत्त्वाचा आहे.






छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आवाहन
पुण्यातील मराठा आंदोलकांची संतप्त प्रतिक्रिया लक्षात घेऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेऊन हिंदुत्वाचा नारा दिला असला तरी सुद्धा मतदारसंघांमध्ये आंदोलकांची धार कमी झाली नाही. त्यातच कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी नितीन गडकरी यांनी सभा घेतली. याचसोबत आता भाजपची दुसरी फळी देखील चंद्रकांतदादा पाटलांसाठी मैदानात उतरली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात विक्रमी मताधिक्याची जुळवणी भारतीय जनता पक्ष करत असताना विरोधकांकडून मात्र दिवसभर कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती शाहू महाराज यांचा व्हिडिओ व्हायरल करून मतदारांमध्ये जनजागृती करण्याची मागणी केली जात आहे.
कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटलांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली, मतदारंसघात रॅली, सभा, बैठकांच्या माध्यमातून मतदारसंघातील जवळपास सगळ्याच मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. हा खरा उत्सुकतेचा विषय आहे.











