सध्या ‘मोबलींचीग’चे रोहित पवार आणि युगेंद्र पवार बळी अन् जीवालाही धोका; पोलीस सुरक्षा द्या: सुळेंची मागणी

0

आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना दडपशाहीचा सामना करावा लागतोय, असंही सुप्रिया सुळे यांनी पत्रात म्हटलं आहे.

आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी पत्रातून केला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यानी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडण शोभादायक नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांचं पत्र जशाच तसं

प्रति,
पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण
महोदय,

लोकसभा निवडणूक प्रचारार्थ श्री. आ. रोहित पवार व श्री. मुनेंद्र पवार हे दौऱ्यामध्ये ठिकठिकाणी जात आहेत. संविधानिक पध्दतीने, शांतपणे व लोकशाही मार्गाने लोकांशी सुसंवाद साधत आहेत. परंतु काही ठिकाणी त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही लोक घेराव घालून त्यांचा आवाज दाबण्याचा
प्रयत्न करत आहेत. विविध वृत्तवाहिन्या व समाज माध्यमातून ही घटना सर्वांसमोर आली. संबंधितांची ही कृती पूर्णपणे असंविधानिक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी राज्यघटनेद्वारा बहाल केलेल्या सर्वसामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आदरणीय स्व. यशवंतराव चव्हाण यानी घडविलेल्या संवेदनशील महाराष्ट्रात असं घडण शोभादायक नाही. या घटनांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण झाला आहेत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ही अतिशय चिंतेची व गंभीर बाब आहे.

सुसंस्कृत व विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. यामुळे आपणाकडून श्री. आ. रोहित पवार व श्री. युगेद्र पवार यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेऊन त्यांना आवश्यक ती सुरक्षा तातडीने पुरविण्यात यावी, ही विनंती आहे. आपण याबाबत विनाविलंब कार्यवाही कराल, असा विश्वास वाटतो. सहकार्याबद्दल धन्यवाद.
सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार