पुणे भाजपचा कच्चाचिठ्ठा ‘सिक्रेट फाईल’ मातोश्रीवर; आत्ता थेट ठाकरीवार? सत्तेची 5 वर्ष भ्रष्टाचार अन् अनागोंदी!

0

महाराष्ट्र राज्यात आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध पक्षांकडून निवडणुकीच्या दृष्टिकोनाने वेगवेगळी रणनीती आखण्यात येत आहे. सर्वाधिक लक्ष लागलेल्या मुंबई आणि पुणे महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्ष जंगजंग पछाडत असतानाच पुणे भाजपाचा पाच वर्षाचा कच्चा चिट्टा माझी नगरसेवकाकडून बनवण्यात आला असून सुखरूप मातोश्री पर्यंत पोहोचवण्याचे कामही झाले आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारावर वारंवार ताशेरे उडणाऱ्या भाजपला जो प्रतिउत्तर देण्याची रणनीती शिवसेना(उबाठा)पक्षाकडून आखण्यात आली आहे. या रणनीतीची फाईल पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सुपूर्त केली आहे.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

दोन दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये महायुतीतील काही स्थानिक नेत्यांचा पक्षप्रवेश घडून आणण्यात आला. त्यासोबतच मुंबईमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बैठक देखील संपन्न झाली. या बैठकीनंतर पुण्यातील शिवसेनेचे नेते वसंत मोरे आणि शहर प्रमुख गजानन थरकूडे आणि संजय मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक फाईल सुपूर्द केली आहे.

या फाईल मध्ये ठाकरे सेनेच्या नेत्यांकडून मागील पाच वर्षांमध्ये भाजपाकडून करण्यात आलेल्या विकास कामांचा कच्चा चिठ्ठा मांडला असल्याचे सांगितले जात आहे. भाजपची एक हाती सत्ता असताना भाजपने कोणकोणते प्रकल्प राबवले आणि त्या प्रकल्पांमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार झाला याची आकडेवारी या फाईल मध्ये मांडण्यात आली आहे.

अधिक वाचा  भाजपच्या ‘पॅनल प्रमुख’च गळाला धोरणाने पालकमंत्री नाराज; थेट ‘तिरकी’चाल अन् बेरजेतून 2007चा पॅटर्न?

भाजपने मागील निवडणुकी कोण कोणती आश्वासन आपल्या वचननाम्यातून दिली होत. आणि किती आश्वासन पूर्ण करण्यात आली याबाबतची आकडेमोड या फाईलच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत पोहोचवण्यात आली आहे. भाजपने मागील पाच वर्षांमध्ये पुणेकरांची कशा पद्धतीने फसवणूक केली याबाबतचा संपूर्ण लेखाजोखा या फाईल मध्ये देण्यात आल्या असल्याचे वसंत मोरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर…

या फाईल मध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराची आणि आणि केलेला गलथान कारभाराची अनेक प्रकरण मांडण्यात आली असून या सर्व प्रकरणांचा भांडाफोड उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यामध्ये करण्याचे नियोजन ठाकरे सेनेकडून करण्यात आला आहे. यासाठी उद्धव ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

मुंबई विकासाची फाईल्स

पुण्यामधील भाजपच्या गलथान कारभारांचा कच्चाचिठा मांडत असतानाच मुंबईमध्ये शिवसेनेची सत्ता असताना कशाप्रकारे कारभार सुरू होता. कशाप्रकारे विकास काम पक्षाच्या माध्यमातून करण्यात आली याचा देखील लेखाजोखा असलेली फाईल उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून पुणेकरांना दाखवण्यात येणार असल्याचं ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरे यांनी सांगितले आहे.