अजित पवारांकडून स्वतःच्याच संचालकांचे वाभाडे गैरकृत्य उदाहरणे अन् विरोधक या जाचकांनाच अध्यक्ष म्हणून जाहीर

0

इंदापूर तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः सभासद असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तेवर असलेल्या संचालकांनी कशा पद्धतीने गैर कारभार केला, याची उदाहरणे खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी देत स्वतःच्याच नेतृत्वाखालील संचालकांचे वाभाडे सर्व सभासदांसमोर काढले. एवढेच नाही तर आत्ता सत्तेवर असलेल्या एकाही संचालकाला संधी मिळणार नाही, असे स्पष्ट करत कारखान्याचे विरोधक असलेले पृथ्वीराज जाचक हेच पुढील पाच वर्षे कारखान्याचे अध्यक्ष असतील, असे जाहीरही करून टाकले.

छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक १० वर्षानंतर सोमवारी ७ तारखेपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर अचानक घडामोडी घडल्या आणि कारखान्यातील विरोधक असलेले शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष तथा कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्यासोबत शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकी घेतली. या बैठकीमध्ये पृथ्वीराज जाचक यांच्याकडे संपूर्ण पाच वर्ष कारखान्याची सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

यावेळी पृथ्वीराज जाचक यांनी रविवारी म्हणजे आज आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यास आपण स्वतः उपस्थित राहून हा निर्णय जाहीर करू असे अजित पवारांनी सांगितले. आणि त्यानंतर आज अजित पवार हे या मेळाव्यासाठी भवानीनगर येथे आपला नियोजित दौऱ्यातील इतर काही कार्यक्रम रद्द करून पोहोचले.