पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरामध्ये एका दगडखाणीत एका हात पाय आणि मुंडके कापून टाकलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. गोडाऊन चौक येथून काहीशा अंतरावर असलेल्या दगड खाणीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृत व्यक्तीजवळ एक मोबाईल आढळून आल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे.






सिताराम ढाले राहणार नांदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव वय 42 वर्ष असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही व्यक्ती सध्या भोसरीतच राहात होती. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सिताराम प्रभू ढाले हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह दगडखाणीत आढळून आला आहे. सिताराम प्रभू ढाले या व्यक्तीचा खून कुणी व का केला? हे अद्याप समजू शकलेले नाही. दिघी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.










