IAS पूजा खेडकर यांचे कारनामे पुन्हा उघडं; पुणे, पिंपरी चिंचवड कनेक्शन प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा दावा

0

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे एकानंतर अनेक कारनामे समोर येत आहेत. आपल्या खासगी कारवर अंबर दिवा लावून थाट आणि अधिकारी पदाचा रुबाब केल्यानंतर त्या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र, पूजा खेडकर यांच्या आयएएस अधिकारी पदाच्या निवडीवरच आता अनेक शंका उपस्थित होत आहेत. कारण, अंपगत्वाचं प्रमाणपत्र दाखवून त्यांनी ही सनदी अधिकारीपदाची नोकरी मिळवली, पण ज्या महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसपदाची पदवी मिळवली, त्या महाविद्यालयाकडे आपण शारिरीकदृष्ट्या फीट असल्याचं प्रमाणपत्र त्यांनीच दिलं असल्याचं उघडकीस आलं आहे. त्यातच, आता पिंपरी चिंचवड  महापालिकेतून त्यांना पायातील अपंगत्वाचंही प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

आयएएस पूजा खेडकर प्रकरणात आणखी एक अपडेट समोर आली आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयएएस पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे. येथील महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून देखील त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं आहे. डाव्या गुडघ्यात 7 टक्केवारीने त्या कायमस्वरूपी आधु असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसतं, त्याअनुषंगाने त्यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवल्याने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचे प्रमाणपत्र समोर आलेलं आहे. त्यामुळे, पूजा खेडकर यांच्या अपंगत्वाबाबतही संशय आणि शंका वाढल्या आहेत.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

दरम्यान, पूजा खेडकर यांची पुणे जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सध्या अकोला येथे त्यांना प्रकल्प अधिकारी म्हणून नेमण्यात आलं असून 19 जुलैपर्यंत त्यांना तेथील कार्यभार देण्यात आला आहे. दुसरीकडे त्यांच्यावरील आरोपांसाठी केंद्र सरकारने 1 सदस्यीय समिती नेमली असून त्यांच्या युपीएससी परीक्षेतील निवडींसदर्भाने चौकशी केली जात आहे.

अधिष्ठाता यांचे म्हणणे

पूजा खेडकर यांनी ऑनलाइन पद्धतीने अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पूजा यांना बोलावून आम्ही तपासण्या केल्या, यात त्या 7 टक्के गुडघ्यात कायमस्वरूपी अधु असल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार हे प्रमाणपत्र आम्ही दिलं. मात्र, त्यांना कमी दिसत होतं हे आमच्या तपासणीत आढळलं नाही, असे पिंपरी चिंचवड वायसीएमचे अधिष्ठाता राजेश वाबळे यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

एमबीबीएसला प्रवेश घेताना फीट

पुण्यातील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात 2007 मध्ये एमबीबीएसला प्रवेश घेतला होता. त्यावेळी सीईटीद्वारे तिला प्रवेश मिळाला होता. तिथे प्रवेश घेताना आपण पूर्णतः फीट असल्याचं, तसेच कोणताही आजार नसल्याचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी वडील दिलीप खेडकर हे क्लास वन अधिकारी असताना देखील त्यांनी ओबीसी कोट्यातून प्रवेश घेत नॉन क्रिमीलियर सर्टिफिकेट देखील सादर केलं होतं. त्यांचे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट हे नगरचे एसडीओ यांचे आहे, अशी माहिती समोर आली आहे.