अफगाणिस्तानच्या राजधानी काबूलमध्ये मोठा स्फोट, तालिबान सरकारच्या मंत्र्यासह 12 जण ठार

0

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये स्फोट झाला आहे. ज्यामध्ये तालिबानचे निर्वासित मंत्री खलील रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बुधवारी काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या कंपाऊंडमध्ये हा स्फोट झाला. ज्यामध्ये १२ लोकं ठार झाले आहेत. हक्कानी हे खोस्तहून येणाऱ्या काही लोकांना होस्ट करत असताना हा हल्ला झाला. तालिबान सरकारने ‘द खोरासान डायरी’शी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली आहे.

राजधानी काबूलमध्ये मंत्रालयाच्या आवारात स्फोट झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीच्या हा आत्मघाती हल्ला मानला जात आहे. रिपोर्ट्सनुसार या स्फोटात हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास असणारे अनेक लोकं जखमी झाले आहेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

खलील रहमान हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका आणि हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख व्यक्ती होते. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर 7 सप्टेंबर 2021 रोजी निर्वासितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

स्फोटात ISIS चा हात असल्याचा संशय

इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरु आहे. त्यामुळे हा हल्ला इसिसकडून केला गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण या प्रकरणात कोणत्याही संघटनेने अद्याप जबाबदारी स्वीकारलेली नाही. इस्लामिक स्टेट (ISIS-K)ने वारंवार असे हल्ले केले आहेत, ज्यामुळे अलीकडील काही महिन्यांत तालिबान सरकारसोबत त्यांचा तणाव वाढला आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा