अमेरिकेचे एका दगडात दोन पक्षी! ‘या’ देशात खतरनाक टायफून मिसाईल तैनात, रशियासह चीनचीही झोप उडाली

0

अमेरिकेने गेल्या काही दिवसांपासून जगाची झोप उडवली आहे. काही दिवसांपूर्वी चीन आणि रशियाचे प्रमुख नेते एकत्र आले होते. या दोन्ही देशांची युती अमेरिकेला पचलेली नाही. त्यामुळे अमेरिकेच्या लष्कराने आता जपानमध्ये पहिल्यांदाच मध्यम पल्ल्याच्या टायफून क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. त्यामुळे चीन आणि रशियाची झोप उडाली आहे. कारण हे दोन्ही देश जपानपासून जवळ आहेत. त्यामुळे वेळ पडल्यास अमेरिका जपानमधून या दोन्ही देशांवर हल्ला करु शकते.

चीनला मोठा धोका

अमेरिकेच्या या निर्णयाचा चीनला सर्वात जास्त धोका निर्माण झाला आहे. कारण अमेरिकेना आधीच दक्षिण चीन समुद्रात चीनचा प्रतिस्पर्धी असलेल्या फिलीपिन्समध्ये हे क्षेपणास्त्र तैनात केलेले आहे. त्यामुळे अमेरिकेने आता दुसऱ्या बाजूनेही चीनला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली रिझोल्यूट ड्रॅगन 2025 नावाच्या युद्धाभ्यासादरम्यान तैनात करण्यात आली आहे, यात 19000 जपानी आणि अमेरिकन सैनिक सहभागी झाले होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

टायफून क्षेपणास्त्र प्रणाली टोमाहॉक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि स्टँडर्ड मिसाइल-6 (एसएम-6) इंटरसेप्टर्स लाँच करण्यासाठी ओळखली जाते. याद्वारे अमेरिका जपानमधून चीनच्या पूर्व किनारी भागावर आणि रशियाच्या काही भागांवर हल्ला करू शकते. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनची ताकद कमी होणार आहे, कारण अमेरिका चीनवर जपान, फिलीपिन्स आणि इतर ठिकाणांवरून हल्ले करू शकते.

फिलीपिन्समध्येही हे क्षेपणास्त्र तैनात

समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेने हे क्षेपणास्त्र जपानमधील नैऋत्य इवाकुनी येथील यूएस मरीन कॉर्प्स तळावर तैनात केले आहे. याआधी गेल्या वर्षी फिलीपिन्समध्ये हे क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले होते. त्यावेळी चीन आणि रशियाने या निर्णयाचा विरोध केला होता. या क्षेपणास्त्राच्या तैणातीबाबत बोलताना अमेरिकन सैन्याच्या 3d मल्टी-डोमेन टास्क फोर्सचे कमांडर कर्नल वेड जर्मन यांनी म्हटले की, रिझोल्युट ड्रॅगन सरावादरम्यान टायफून किंवा इतर क्षेपणास्त्र प्रणाली वापरण्यात आलेले नाही.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

जपानची आपली लष्करी ताकद वेगाने वाढवत आहे. जपानला चीन, उत्तर कोरिया आणि रशियापासून धोका आहे. त्यामुळे जपान मध्यम ते लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करत आहे. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने दावा केला होता की, चीनची नवीन विमानवाहू युद्धनौका फुजियान पूर्व चीन समुद्रात असणाऱ्या जपानी सेनकाकू बेटांच्या उत्तरेस दिसले होते, मात्र चीनने हा दावा फेटाळला होता.