अ‍ॅडलेडमधील पराभवानतंर रोहित शर्माबाबत मोठा निर्णय, नेमकं काय झालं?

0

टीम इंडियाला अ‍ॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पहिल्या पराभवाचा वचपा घेतला आणि मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. टीम इंडियाच्या या पराभवानंतर आता तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहेत. रोहित शर्मा पुन्हा नेहमीप्रमाणे ओपनिंगला येणार की मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करणार? याबाबत चर्चा पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित तिसऱ्या सामन्यातही मधल्या फळीतच खेळणार असून केएल आणि यशस्वी हेच ओपनिंग करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रोहित पाचव्या किंवा सहाव्या स्थानी खेळू शकतो.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

रोहित शर्मा फ्लॉप

दुसऱ्या कसोटी सामन्यात काही खेळाडूंचा अपवाद वगळता इतर सर्व अपयशी ठरले. विराट आणि रोहित या अनुभवी खेळाडूंकडून इतरांच्या तुलनेत चांगल्या खेळीची अपेक्षा असते. रोहितला गेल्या काही काळात ओपनिंगला काही खास करता आलं नाही. रोहित दुसऱ्या सामन्यात मधल्या फळीत बॅटिंगसाठी आला. पण त्याने तिथेही तेच केलं जे ओपनिंगला आतापर्यंत केलं होतं. रोहितने इथेही निराशा केली आणि ढेर झाला.

टीम इंडियाने अ‍ॅडलेडमध्ये पराभवानंतर सराव केला. विराट आणि रोहित हे दोघेही या सरावात सहभागी झाली होते. मात्र इथेही दोघांनी निराशा केली. दोघांनी नेट्समध्ये बराच वेळ सराव केला. मात्र इथेही दोघांना संघर्ष करायला लागला. विराट-रोहितला आपल्याच गोलंदाजांचा निट सामना करता येत नव्हता. आता पुढील तिसरा कसोटी सामना हा द गाबा, ब्रिस्बेन येथे होणार आहे. इथे धावा करणं सोपं नाही. त्यात रोहित-विराटची नेटमधील अशी अवस्था, त्यामुळे भारतीय चाहत्यांना चिंता वाटू लागली आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यु ईश्वरन, देवदत्त पडिक्कल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश कुमार रेड्डी आणि वॉशिंगटन सुंदर.