उद्धव ठाकरे यांचा 3 ऑगस्टला ‘एल्गार’ पुणे शिवसेना कात टाकेलं? स्थळ पुणे पण तिन्ही नियंत्रक मात्र मुंबईचे!

0

पुणे शहरातील वाढतं भारतीय जनता पक्षाचे वलय…. आठही मतदार संघात 2014 मध्ये मिळवलेला विजय! अन शिवसेनेची दिवसेंदिवस पुणे शहर आणि जिल्ह्यात होत असलेली अधोगती! याचा विचार करून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार, प्रवक्ते संजय राऊत, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर व पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर या तीन नेत्यांनी गेली दोन वर्ष पुणे बांधणी करण्याचं काम केलं! उत्तम संघटन असतानाही 2017 मध्ये पुणे महापालिका अन् 2014 व 2019 (युतीधर्म) शिवसेनेच्या पदरी पडत असलेली निराशा मुंबईच्या जिव्हारी लागल्यानंतर पुनर्बांधणी केलेल्या जुन्या अन् नव्या कार्यकर्त्यांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 3 ऑगस्ट रोजी मेळावा होत आहे! या निमित्ताने या पक्षाकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पुण्यात भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना ‘औरंगजेब फॅन क्लब’चे ठाकरे अध्यक्ष अशी कडवट टीका शहा यांनी केली होती. भारतीय जनता पक्षाबरोबर युती केल्याचा सर्वात जास्त फटका पुणे शहराला बसला असून आज पुणे शहरामध्ये भाजपा विजयी नगरसेवकांची शंभरी (2014 आठ आमदार अन् 2019 सर्वजागी आमदारांची उमेदवारी) साजरी करत असताना शिवसेना मात्र एक आकडी नगरसेवकांवर अडकल्यामुळे मुंबईतून पुणे शिवसेना नियंत्रित करण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने करण्यात आला. त्यानुसार गेली दोन वर्ष खासदार संजय राऊत सचिन अहिर आदित्य शिरोडकर या 3 खंद्या शिलेदारांकडून विधानसभेनुसार संघटन बांधणी केली असून ….योग्य बांधणी झाल्यानंतरच उद्धव ठाकरे यांचा मेळावा घेतला जाईल! हा दिलेला शब्द या तिघांकडून तीन ऑगस्टला पूर्ण केला जात आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी आणि इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेकडूनही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. पर्वती, हडपसर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेकडून दावा (हडपसर आणि कोथरूड माजी आमदार) करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर या मेळाव्यात या मतदारसंघांतील इच्छुकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.

या मेळाव्याच्या दृष्टीने शहर पातळीवर नियोजनही सुरू करण्यात आले आहे. सचिन अहिर यांच्या अध्यक्षेखाली 2 ते 3 दिवसांत बैठकही होणार असून पुणे शहर यशस्वी नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना देण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच खासदार, प्रवक्ते संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आणि आमदार भास्कर जाधव गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे पुण्यातील मेळाव्यात या टीकेला काय उत्तर देतात, याबाबत उत्सुकता असणार आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार