धक्कादायक! हेलिकॉप्टर दुर्घटनेत इराणचे राष्ट्रपती रईसी यांचा मृत्यू

0
2

इराणसाठी एक वाईट बातमी आहे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टपर दुर्घटनेत निधन झालं आहे. अजरबैजानवरुन परतताना इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. खराब हवामानामुळे इब्राहिम रईसी यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. काल संध्याकाळी या हेलिकॉप्टरचा हार्ड लँडिंग झाल्याच कळलं. हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. खराब हवामानामुळे बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अनेक अडचणी येत होत्या. इराणी मीडिया रेड क्रिसेंटनुसार, बचाव पथराला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सापडलं आहे. क्रॅश साइटवरुन फोटो समोर आलेत. या भीषण अपघातातून कोणी वाचण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. इराणच्या सरकारी टेलीविजनने सोमवार सांगितलं की, राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि अन्य अधिकारी असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये कोणी जिवंत असण्याचे संकेत नाहीयत.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?

रईसी अजरबैजान प्रांताच्या दौऱ्यावर गेले होते. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना इराणची राजधानी तेहरानपासून 600 किलोमीटर (375 मैल) उत्तर-पश्चिमेला अजरबैजान देशाच्या सीमेला लागून असलेल्या जुल्फा शहराजवळ झालीय. या हेलिकॉप्टरमध्ये राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री हुसैन अमीराब्दुल्लाहियन, पूर्व अज़रबैजानचे अयातुल्ला अल-हाशेम आणि पूर्व अजरबैजान प्रांताचे गवर्नर मालेक रहमतीसोबत त्यांचे अंगरक्षक सुद्धा होते.

पाऊस आणि दाट धुक्यांमुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या. दुर्घटना घडली, त्या ठिकाणी हवामान खूप खराब होतं. इराणच्या हवामान विभागाने अजून हवामान बिघडण्याचा अंदाज वर्तवलाय. पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवलाय.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे