‘नथुराम’ने ‘गांधीवधा’त सावरकर आणि संघालाही मारलं; सावरकरांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न सुरूच: भाजपा माजी खासदाराचे स्पष्ट मत

0

पुणे : ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नथुराम गोडसे हे वैचारिकदृष्ट्या एक नाहीत. महात्मा गांधींवर झाडण्यात आलेल्या तीनपैकी एका गोळीने त्यांची हत्या केली, दुसऱ्या गोळीने सावरकरांची पुण्याई संपवली आणि तिसऱ्या गोळीने हिंदूंचा कैवार घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांना अनेक दशके राजकीय अस्पृश्य ठरविण्यात आले, याचे भान ठेवून हा घोळ दुरुस्त केला पाहिजे,’ अशी परखड भूमिका माजी खासदार प्रदीप रावत यांनी रविवारी मांडली.

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टतर्फे डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सहकार्याने आयोजित ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रदीप रावत बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सात्यकी सावरकर, संयोजन समितीचे धनंजय बर्वे व रणजित नातू या वेळी उपस्थित होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न सुरू आहे; परंतु सावरकरांचा विचार हा देशाचा राष्ट्रीय प्रवाह झाला आहे. हा विचार बहुजनांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी राबविण्यात येणारा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे,’ असे रावत यांनी सांगितले. ‘सावरकरांचे अनुकरण करताना त्यांचे बुद्धिनिष्ठ व व्यावहारिक विचार आत्मसात केले पाहिजेत,’ असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले.

सावरकरांचे अनुकरण करताना त्यांचे चार आत्मसात केले पाहिजे

‘सावरकरांचे हिंदुत्व हा पोरखेळ नसून, हिंदूंच्या अधिकारांचे संरक्षण आहे. त्यांच्या नावे खोटे पसरविणे ही त्यांची बदनामी आहे. संविधानाची प्रत हाती घेऊन सावरकरांची अपकीर्ती करणारे आज न्यायालयात येण्यास घाबरत आहेत. मात्र, त्यांना न्यायालयाचा दणका देण्यासाठी लढत राहणार,’ असा निर्धार सात्यकी सावरकर यांनी व्यक्त केला. धनंजय बर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रवीण गोखले यांनी सूत्रसंचालन केले

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती