मतदानाच्या दिवशीच मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका

0
1

देशातील ४९ जागांवर मतदान सोमवारी सुरु झाले. त्यात महाराष्ट्रातील १३ जागांवर मतदान होत आहे. मतदानाच्या या शेवटच्या टप्प्यातील मुंबईतील सहा जागांवर मतदान सुरु झाले आहे. मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. यामुळे कल्याणकडून मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या 15 मिनिट उशिरा धावत आहे. त्याच्या फटका निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला आहे. तसेच सकाळी लवकर मतदान करुन कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला आहे. रेल्वे स्टेशन आणि परिसरात चाकरमान्यांसह प्रवशांची गर्दी कल्याण रेल्वे स्थानकावर झाली होती.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

निवडणूक कर्मचाऱ्यांना बसला फटका

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांवर मतदान होत आहे. या मतदानासाठी निवडणूक कर्तव्यावर निघालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या अनागोंदी कारभाराचा फटका बसला आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे मतदान केंद्रावर पोहचण्यास काही कर्मचाऱ्यांना उशीर झाला. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मध्य रेल्वे विस्कळीत झाली असताना पश्चिम रेल्वेची सेवा सुरळीत सुरु होती.

एकाच दिवशी तिघांचा मृत्यू

उल्हासनगर आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात पाहिला मृत्यू उल्हासनगर येथे शुक्रवारी संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास झाला. उतरण्यासाठी ट्रेनच्या दारात उभा असलेल्या 55 वर्षीय पद्मन्ना पुजारी यांचा विठ्ठलवाडी ते उल्हासनगर दरम्यान ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. दुसरी घटना ठाकुर्ली आणि डोंबिवली स्थानकादरम्यान घडली. ट्रेनच्या दारात उभा असलेला 24 वर्षीय भिवंडीचा रहिवासी सुनील चव्हाणचा पडून मृत्यू झाला. तिसरी घटना शुक्रवारी संध्याकाळी दिवा आणि कोपरस्टेशन दरम्यान ट्रॅक ओलांडताना झाला असून अज्ञात प्रवाशाला रेल्वेने धडक दिल्याने प्रवाशाचा जागेच मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीचा शोध लागला नाही. एकाच दिवसात तीन जणांचा मृत्यू झाल्याने रेल्वे संघटना आक्रमक झाली आहे. सकाळी मुंबईकडे जाणाऱ्या व संध्याकाळी मुंबईकडून परतणाऱ्या ट्रेनच्या संख्येत वाढ करण्याची मागणी केली आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर