अमेरिका खरच आपला मित्र असेल तर ती 75 फायटर जेट्स तसा करारही पण…; भारतासाठी फक्त एक छोटीशी गोष्ट करा

0

सध्या भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सदृश्य स्थिती आहे. पाकिस्तान या सगळ्या परिस्थितीला जबाबदार आहे. भारतावर जळफळाट करणाऱ्या या देशाची आर्थिक स्थिती वाईट आहे. गृह युद्धाच्या उंबरठ्यावर हा देश आहे. पण, तरीही युद्ध लढण्याची पाकिस्तानची खुमखुमी अजून गेलेली नाही. मागचे सलग तीन दिवस त्यांनी भारतावर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला. भारताने आपल्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे त्यांचे सर्व हल्ले परतवून लावले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या पाकिस्तानने दहशतवाद्यांवरच्या प्रेमाखातर युद्धासारखी स्थिती आणली आहे. भारताने 7 मे रोजी पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये अनेक मोठे दहशतवादी मारले गेले.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

या दहशतवाद्यांचे पाकिस्तानने राजकीय इतमामात दफनविधी केले व आपली खरी ओळख जगाला दाखवून दिली. कारण काही जागतिक दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानातले नेते, लष्करी अधिकारी या दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला हजर होते. त्याचे व्हिडिओ, फोटो समोर आले आहेत. पाकिस्तानने मागच्या तीन दिवसात जम्मू-काश्मीरपासून गुजरातच्या भूजपर्यंत म्हणजे उत्तरेकडून पश्चिमेपर्यंत अनेक हल्ले केले आहेत. यासाठी पाकिस्तानने ड्रोन, मिसाइल आणि त्यांची फायटर विमान वापरली आहे.

तसा करार आहे, पण…

पाकिस्तानने त्यांचं F-16 विमानही भारतावर हल्ल्यासाठी वापरलं आहे. F-16 हे अमेरिकेने पाकिस्तानला दिलेलं फायटर जेट आहे. पाकिस्तानला अमेरिकेने अशी 75 फायटर जेट्स दिली आहेत. फक्त दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी अमेरिकेने ही विमानं दिली आहेत, तसा करार आहे. पण पाकिस्तान भारताविरोधात या विमानांचा वापर करतोय. भारत मूळातच ही सर्व लढाई दहशतवादाविरोधात लढत आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

त्यांचीच इज्जत वाचेल

अमेरिकेने दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला पाठिंबा दिला आहे. अशावेळी पाकिस्तान F-16 विमानासंदर्भात अमेरिकेशी केलेला करार मोडत आहे. अशावेळी अमेरिकेने काहीही करुन, पाकिस्तानला F-16 विमानांचा वापर करायला देऊ नये. तितकी सक्ती अमेरिकेने दाखवावी. एवढीच अमेरिकेकडून माफक अपेक्षा आहे. कारण सध्याच्या घडीला पाकिस्तानकडे जी शस्त्र आहेत, त्यातल्या त्यात हेच एक थोडं चांगलं शस्त्र आहे. मागच्या तीन दिवसात भारताने पाकिस्तानची काही F-16 विमान पाडल्याच्या बातम्या येत आहेत. अमेरिकेने पाकिस्तानला या विमानाचा वापर करण्यापासून रोखावं, त्यांचीच इज्जत वाचेल.