मुलुंडमध्ये भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे ठेवल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राडा केला आहे. मुलुंडचा राडा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना भोवला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 25-30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पाच जणांना अटक केली आहे.
मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याची गंभीर कलमासह 25-30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
दोन लाख रुपये रक्कम जप्त
गुरुजोतसिंह , अभिजित चव्हाण, रोहित चिकने, दिनेश जाधव, अनंत पवार अशी अटक कार्यकर्त्यांची नावे आहे. काल दोन लाख रुपये रक्कम जप्त करण्यात आली आहे. कलम 353,332,341,143,147,149 कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.