पोर्श अपघातात बाप अन् आजोबांचे तपासात असहकार्य; बाल हक्क मंडळाचा ‘अल्पवयीन’च्या चौकशीस परवानगी

0
12

पोर्श कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना परवानगी दिली. या अपघातात एका अल्पवयीन मुलाच्या गाडीने दोन सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी विरुद्ध तपास करण्याची परवानगी मागितली होती. हा अल्पवयीन आरोपी सध्या सुधारगृहात आहे.

पोर्श कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाची चौकशी करण्यास बाल हक्क न्याय मंडळाने पोलिसांना परवानगी दिली. या अपघातात एका अल्पवयीन मुलाच्या गाडीने दोन सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू झाला होता, पोलिसांनी बाल हक्क न्याय मंडळाला पत्र लिहून 17 वर्षीय अल्पवयीन आरोपी विरुद्ध तपास करण्याची परवानगी मागितली होती. हा अल्पवयीन आरोपी सध्या सुधारगृहात आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे म्हणाले की, बाल न्याय मंडळासमोर सुनावणी झाली आणि त्यांनी आमची याचिका मान्य केली. पुण्यातील कल्याणीनगरमध्ये 19 मे रोजी अपघात झाला तेव्हा अल्पवयीन मुलगा महद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत होता, असा पोलिसांचा दावा आहे. बाल न्याय कायद्यानुसार अल्पवयीन मुलाची त्याच्या पालकांच्या उपस्थितीत चौकशी केली जाईल. या अपघाताबाबत समोर आलेल्या नव्या घटना पाहता पोलीस या अल्पवयीन आरोपीचा तपास करणार आहेत.

दरम्यान, उपायुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती पुढील आठवडद्वापर्यंत अहवाल सादर करणार असल्याचे महिला व बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. यापूर्वी, कार अपघातात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील आणि आजोबा यांना पुण्यातील न्यायालयाने त्यांच्या चालकाचे अपहरण आणि ओलीस ठेवल्याप्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार