नवी दिल्ली: चॅट जीपीटी हे आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सचं टूल बनवणारी इस्रायली कंपनी ओपन एआयनं भारतातील सध्याच्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात एक खळबळजनक खुलासा केला आहे. भारतातील लोकसभा निवडणुकीत एआयचा वापर झाल्याचा दावा या कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी भाजपच्या विरोधात अजेंडा राबवण्यासाठी एआयचा वापर केल्याचं विविध माध्यमांतील वृत्तांमध्ये म्हटले आहे.
माध्यमातील वृत्तांनुसार, इस्राइलची कंपनी STOIC नं AI च्या मदतीनं भारतातील लोकसभा निवडणुकीदरम्यान काल्पनिक युजर आणि त्यांचे बायी तयार करण्यात आले. या काल्पनिक व्यक्तीच्या सोशल मीडिया हँडलवरून विविध प्रकारच्या पोस्ट केल्या गेल्या, त्यानंतर अनेक बनावट अकाऊंट्सही बनवली गेली. याच बनवाट अकाऊंट्सवरुन सोशल मीडियावर पोस्टकर कमेंट्स केल्या गेल्या कारण हा संवाद किंवा एंगेजमेंट खरी वाटावी. ओपन एआयच्या माहितीनुसार, या कंपनीनं भाजपविरोधात आणि विरोधकांच्या समर्थनार्थ कटेन्ट प्रसारित करण्याचा प्रयत्न केला.
अशा प्रकारे तयार झालं नेटवर्क
पण हे नेटवर्क कसं तयार केलं गेलं ते जाणून घेऊयात. Open Al नं आपल्या वेबसाईटवर एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात म्हटले की, इस्राईलची एक कंपनी STOIC नं गाझा युद्ध आणि भारतातील सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान सोशल मीडिया अकाऊंट्स तयार केले. मे महिन्यात या बनावट अकाऊंट्सवरुन भारताबाबत कमेंट्स सुरु झाल्या, यामध्ये सत्ताधारी पक्षांवर टीका केली गेली तर विरोधकांचं कौतुक केलं गेल.
या अहवालानुसार, या गोष्टी लक्षात आल्यानंतर केवळ २४ तासांतच थांबवल्या गेल्याचा दावाही ओपन एआयनं केला आहे. ओपन एआयनं म्हटलं आहे की, इसाईलमधून ऑपरेट केल्या जाणाऱ्या अशा अनेक सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केली गेली, फेसबूक, इन्स्टाग्राम, एक्स आणि युट्यूबवर है अकाऊंट्स तयार करण्यात आले होते. या अकाऊंट्सद्वारे विविध प्रकारच्या भाजविरोधी पोस्ट केल्या गेल्याचंही या अहवालात म्हटल्याचं वृत्त माध्यमांनी दिलं आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या प्रकाराची कडाडून निंदा केली आहे. त्यांनी द्विटरवर लिहिलं की, आता है पूर्णपणे स्पष्ट झालंय की, भारतातील काही राजकीय पक्षांनी परदेशातील कंपन्यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लोकशाहीसाठी ही भीतीदायक धमकी आहे. याची सखोल चौकशी करून त्याचा पर्दाफाश करण्याची गरज आहे. मला वाटतं की हा खुलासा यापूर्वीच व्हायला हवा होता, कारण आता निवडणुका संपल्या आहेत.