पंढरपूरच्या 900 वर्षापुर्वीच्या ‘विठ्ठल’ मंदिरात सापडलं तळघर, प्राचीन मूर्ती, जुनी नाणी, आणखी काय दडलंय?

0

महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या आत तळघर आढळून आलंय. मंदिराचं प्राचीन पद्धतीनं संवर्धन करण्यात येत होतं. हे काम पूर्णत्वास जातानाचं कर्मचान्यांना तळघराचा शोध लागलाय. या तळघरात नेमकं काय दहलंय पाहूयात….

नऊशे वर्षापुर्वीच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम 15 मार्चपासून सुरू होतं. 2 जूनपासून मंदिर भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी खुले करण्यात येणारय. मात्र त्यापुर्वीच विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आलंय, यासंदर्भात मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळकेंनी माहिती दिलीय. विठ्ठल मंदिरात आढळून आलेल्या तळघरात 1 विष्णूरुपी मुर्ती, 1 व्यंकटेश मुर्ती, 1 तुळजा भवानी मुर्ती, इतर 3 दगडी मूर्ती, बांगड्याचे तुकडे, पादुका आणि जुनी नाणी आढळून आलेत.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

नऊशे वर्षापुर्वीच्या विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम 15 मार्चपासून सुरू होतं. 2 जूनपासून मंदिर भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे, मात्र त्यापुर्वीच विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आलंय. यासंदर्भात मंदिर समितीचे मुख्याधिकारी राजेंद्र शेळकेंनी माहिती दिलीय.

भेटी लागे जीवा, लागलीसे आस म्हणत लाखो वारकरी विठूरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने जात असतात. मात्र आषाढी वारीच्या पुर्वीच पंढरपूरच्या मंदिरात तळघर आढळून आलंय. तर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनीही मंदिरातील तळघराची पाहणी केलीय. यात मुर्ती, पादुका, बांगडांचे तुकडे आणि जुनी नाणी आढळून आलेत. त्यामुळे या तळघरातील मुर्ती कधीच्या आहेत? याचं गूढ़ पुरातत्व विभागाच्या अभ्यासातून उलगडणार आहे.

अधिक वाचा  बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मालमत्ता जप्तीचा आदेशही रद्द; नियमित कायदेशीर व्यवहार म्हणजे ‘किकबॅक’ नव्हे