मविआचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला!; ‘हे’ आहेत संभाव्य उमेदवार; ही दोन बिगर राजकीय नावे चर्चेत

0

लोकसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सरळ सामना होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीने आता जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यात आता जागा वाटपामध्ये महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्मुला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील एकूण ११ जागा वाटपाचे सूत्रही निश्‍चित झाले असल्याचे समजते. काही जागांवरील उमेदवारही निश्‍चित करण्यात आले आहेत. दोन दिवसांत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या नावांची व जागांची घोषणा करण्यात येणार आहे.

मराठवाड्यात काही जागांवर शिवसेना ठाकरे गट व वंचितमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या जागांचा तिढा सुटल्यानंतर येत्या दोन दिवसांत राज्यातील ४८ मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार व पक्षनिहाय मिळालेल्या जागांची घोषणा करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या बुधवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर लोकसभा मतदार संघ काँग्रेसला देण्यावर; तर सांगली शिवसेना ठाकरे गटाकडे देण्यावर एकमत झाल्याचे समजते. कोल्हापुरातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, तर सांगलीतून महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारीही निश्‍चित झाल्याची माहिती आहे.

याबाबत बुधवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘सिल्वर ओक’वर प्रत्यक्ष भेट झाली. यावेळी खासदार अनिल देसाई उपस्थित होते, तर वंचित आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात ऑनलाइन सहभागी झाले होते.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

कोल्हापूरची जागा शिवसेनेने जिंकल्याने ती जागा आपल्यालाच मिळावी यासाठी ठाकरे आग्रही होते. शाहू महाराज यांना उमेदवारी द्या पण जागा आम्हाला द्या अशीही तयारी त्यांनी दर्शवली होती. पण, स्वतः शाहू महाराज शिवसेनेच्या तिकिटावर लढायला तयार नाहीत आणि ठाकरे गटाकडे दुसरा कोण प्रबळ उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यास ठाकरे तयार झाल्याचे समजते.

महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार

पुणे – काँग्रेस – आमदार रवींद्र धंगेकर

मावळ – शिवसेना ठाकरे गट – माजी सभापती संजोग वाघेरे

शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’- खासदार डॉ. अमोल कोल्हे

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’- खासदार सुप्रिया सुळे

सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’- खासदार श्रीनिवास पाटील किंवा सारंग पाटील

सोलापूर – काँग्रेस – आमदार प्रणिती शिंदे

सांगली – शिवसेना- ठाकरे गट – चंद्रहार पाटील

हातकणंगले – स्वाभिमानीसाठी जागा सोडली

कोल्हापूर – काँग्रेस – श्रीमंत छत्रपती शाहू महाराज