पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून काल शपथ घेतली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. त्यांच्यासोबत कैबिनेट आणि राज्यमंत्री मिळून 71 जणांनी शपथ घेतली आहे. नव्या मंत्रिमंडळात जुन्या अनुभवी नेत्यांसोबतच अनेक नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मोदीच्या या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश केला आहे. यामध्ये पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे राज्यमंत्री म्हणून नाव सगळ्यांना आश्चर्यचकित करून गेले.






आज झालेल्या मंत्र्यांच्या खातेवाटपात मुरलीधर मोहोळ यांना सहकार खाते मिळाले आहे. मोहोळ यांना मिळालेले हे सहकार खाते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी गेमचेंजर ठरू शकते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा पटकार
महाराष्ट्र राज्य है प्रामुख्याने सहकार चळवळीसाठी ओळखले जाते. राज्यात विविध कार्यकारी सोसायट्या, दुग्ध व्यवसाय, नागरी सहकारी बँका, नागरी पतसंस्था आणि सर्वात महत्त्वाचे साखर कारखानांच्या माध्यमांतून काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीने ग्रमीण भागांवर आपली पकड निर्माण केली आहे.
काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या राजकीय यशात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत केंद्रात सहकार मंत्रालय अस्तित्वात नव्हेत. पण मोदी सरकारच्या गेल्या कार्यकालात त्याची निर्मिती कण्यात आली. आणि आता सहकाराचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील खासदार मुरलीधर मोहक यांना सहकार खात्याचे राज्यमंत्री करत भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी षटकार ठोकला आहे.
विधानसभा निवडणुकीत मोहोळ यांचा सहकार खाते ठरणार गेमचेंजर ?
राज्यातील सर्व प्रमुख सहकारी साखर कारखाने काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रावदी काँग्रेसच्या नेत्यांच्या हातात आहेत. याच्याच जोरावर या नेत्यांनी आपली राजकीय कारकिर्द उभी केली आहे. दरम्यानच्या काळात अनेक साखर कारखाने डबघाईला आल्याचे आपण पाहिले आहे. काही कारखाने कर्जबाजारी झाले आहेत. तर काही कारखाने बुडाले आहेत.
अशा परिस्थितीत गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीतील कारखानदारी करणाऱ्याा अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपआपल्या कारखान्यांना मतद मिळवत कारखाने वाचवले आहे.
अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना सहकार राज्यमंत्रीपद मिळाल्याने अनेक कारखानदार अडचणीत असलेले कारखाने वाचवण्यासाठी भाजप प्रवेश करू शकतात. त्यामुळे आपोआपच विधानसभेसाठी भाजपला याचा फायदा होऊ शकतो हे नक्की.










