बृजभूषणसिंहांच्या मुलाच्या ताफ्यातील फॉर्च्युनरने तिघांना चिरडले; 2 मुलांचा मृत्यू, भीषण दुर्घनटेनंतर संताप

0
1

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. बड्या बापाच्या लेकरास वाचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय नेत्यांनी कितीतरी दबाव टाकल्याचे आता उघड झाले आहे. एकीकडे पुण्यातील हे प्रकरण अतिशय गंभीर वळणावर असतानाच आता उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण शरणसिंह यांच्या मुलाच्या ताफ्याताली फॉर्च्युनर कारने दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे.

खासदारपुत्राच्या ताफ्यातील UP. HW. 1800 या व्हाइट रंगाच्या फॉर्च्युनर कारने तिघांना धडक दिली, त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. ब्रिजभूषण शरणसिंह यांच्या मुलाच्या ताफ्यातील कारने भरधाव वेगात तिघांना उडवले. त्यामध्ये, दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. करण ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे उत्तर प्रदेशातील उमेदवार आहेत.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

ऑलिंपिकविजेत्या महिला पैलवानांनी लैंगिक शोषणाचे आरोप करत खासदार ब्रिजभूषण सिंह शरण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन घेडले होते. त्यांनतर, देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी, न्यायालयाच्या आदेशान्वये ब्रिजभूषण चरणसिंह यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर, भाजपने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापून त्यांचा मुलास उमेदवारी दिली. आता, त्याच उमेदवार असलेल्या त्यांच्या मुलाने दोघांना कारखाली चिरडलं आहे. करणसिंह यांना गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. देशातील लोकसभा निवडणुकांचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी पार पडत आहे. या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकांच्या प्रचारासाठी करण शरणसिंह यांचा ताफा जात होता. त्यावेळी, कैसरगंज येथून हुजूरपूरकडे जात असताना बैकुंठ डिग्री कॉलेजजवळ ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून फॉर्च्युनर कार जप्तही करण्यात आली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, घटनास्थळावर करणसिंह यांनी न थांबता ते पुढे निघून गेल्याची माहिती आहे.

अधिक वाचा  पुण्यात १४ वर्षात नदीची वहन क्षमता घटल्याने पुराचा धोका ४०% नी वाढला

दरम्यान, महाराष्ट्रात पुणे हिट अँड रन अपघात प्रकरण गंभीर बनलं असताना, आता आणखी एक बड्या बापाच्या मुलाने दोन निष्पाप जीव घेतल्याने संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या घटनेतील कारचे व्हिडिओ व्हायरल झाले असून पोलिसांनी ही कार जप्त केली आहे. मात्र, याप्रकरणी आता कारवाई होणार का, राजकीय दबाव येणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.