…तर विशाल अग्रवालला वाचवणारी सगळी नावं समोर येतील, पुणे अपघातप्रकरणी प्रकाश आंबेडकरांची एन्ट्री!

0
1

पुणे: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सवाल उपस्थित केलेत. विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला?, विशाल अग्रवालसोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागिदारी आहे?, याचा खुलासा झाल्यास विशाल अग्रवालला वाचवणार नावे समोर येतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ते अकोल्यात बोलत होते. बेदरकारपणे वाहन चालवण्यासंदर्भात नवा कायदा जोपर्यंत होत नाहीय तोपर्यंत अशी प्रकरण घडतच राहतील. याप्रकरणात सध्या अजित पवारांवर होत असलेल्या आरोपांवर काहीही बोलायला त्यांनी यावेळी नकार दिलाय.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ही एक केस नाही, अशा अनेक केस आहेत. अपघाताच्या दुसऱ्या दिवशी तिथे असणारा डॉ. जोंधळे यांनाही अस फरपटत नेले. डॉ. जोंधळेंचे नावच कुठेही येत नाही, त्यांनाही असे मारण्यात आले आहेत. त्यामुळे असे मानतो की, त्याच्या मागे राजकारण जे काही असेल पण हा वाहनचालकांचा निष्काळजीपण आहे, त्यालाही कुठेतरी कडक शिक्षा केली पाहिजे. कारण आई- बापांचा मुलांवर कोणतेच नियंत्रण राहिले नाही. असे एकंदरीत दिसते . त्यामुळे कडक कायदा येणे आवश्यक आहे. अल्पवयीन असो की प्रौढ त्यासंदर्भात कडक कायदा येत नाही, या प्रकाराला आळा बसणार नाही.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

अजित पवारांवरील आरोपांवर बोलणार नाही, पोलीस सांगतात त्याच नावांवर विश्वास : प्रकाश आंबेडकर 

विशाल अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला? विशाल अग्रवालसोबत बांधकाम व्यवसायात कोणाची भागिदारी आहे?, अग्रवालने कोणत्या राजकीय पक्षांना पैसा पुरवला?, याचा खुलासा झाला तर त्याला वाचवणारी सर्वच नाव समोर येणार आहेत. अजित पवारांवरील आरोपांवर सध्या काहीच बोलणार नाही. सध्या पोलीस सांगतात त्याच नावांवर विश्वास ठेवावा लागेल, असेही आंबेडकर म्हणाले.

पुणे अपघाताची घटना ‘एआय’द्वारे जिवंत करणार

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अपघाताची घटना ‘एआय’द्वारे जिवंत करण्यात येणार आहे. डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. रॅश ड्रायव्हिंग अपघातातील दोषीला कडक शिक्षा व्हावी, यासाठी तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर पोलीस भर देत आहेत. ‘एआय’मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

अधिक वाचा  रोहित शर्माने 2० किलो वजन कमी कसं केलं, संपूर्ण दिवसाचा दिनक्रम अन् आहार