काल राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं जाहीर झाली. यात बारामतीतून सुप्रिया सुळे यांचं महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलं आहे. आज सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. उमेदवारी आणि बारामतीतील लढतीवर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. मी इंडिया आघाडीचे आभार मानते. पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढण्याची मला संधी दिली. बारामती लोकसभा मतदारसंघाचे आभार मानते… पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून द्यावं, अशी विनंती करते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं.






ही विचारांची लढाई- सुळे
माझ्यासाठी वैचारिक लढाई कुठल्या ही व्यक्तीशी नाही. मी वयक्तिक टीका केलेली नाही. महागाई, बेरोजगारी, दडपशाही विरोधात माझी लढाई असणार आहे. देशाच्या धोरणांचा राजकारण आहे. धोरणात्मक काम आहे. माझं लोकसभेतील काम देशाने पाहिलं आहे. मला पुन्हा संधी मिळाली आहे , माझं मेरिट पाहून मतदान करा, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. निलेश लंके यांना दक्षिण अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. त्यांना शुभेच्छा दिल्या.
सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवर म्हणाल्या…
सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची काल घोषणा झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली. यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. आमचं घर फोडून भाजपला उमेदवार द्यावा लागतो. मोठ्या भावाची बायको ही आई समान असते आणि त्यांना आमच्या आईला निवडणुकीत उतरून भाजपला निवडणूक लढावी लागते. हे किती दुर्दैवी आहे. हेच भाजपचं राजकारण आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मोदी सरकार लोकशाहीमध्ये दडपशाही करत आहेत. लोकशाही अडचणीत अली तर किती ही किंमत मोजावी लागली तरी त्याच्या विरोधात आम्ही लढू, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध केला आहे.
गुन्हेगारी राज्यात वाढली आहे. सत्तेत असलेले आमदार पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार करतात अशावेळी ही सरकार का आदर्श देते. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात. तेव्हा राज्यात गुन्हेगारी वाढते हे डेटा सांगतो, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.











