लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपसाठी महायुतीची बोलणी अजूनही सुरुच आहे. लोकसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा तारीख संपली आहे. भाजपने आठवी यादी जाहीर केली आहे. परंतु राज्यातील जागा वाटपाची कोंडी संपलेली नाही. यामुळे वाद असलेल्या जागा सोडून महायुतीमधील तिन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. जागा वाटपावर तोडगा काढण्यासाठी महायुतीमधील शिवसेना-भाजपची सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’वर बैठक झाली. शुक्रवारनंतर शनिवारी मध्यरात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे चर्चेच्या फेऱ्या सुरुच होत्या. शनिवारी तब्बल साडेतीन तास खलबते झाले. विशेष म्हणजे शनिवारी झालेल्या चर्चेत खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण येथील जागेवर भाजपचा दावा केला जात आहे.






या नेत्यांची उपस्थिती
महायुतीतील जागा वाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर पुन्हा शनिवारी खलबते झाले. बैठकीसाठी सुरुवातील भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 11.30 ला वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर उदय सामंत रात्री 12.15 ला वर्षावर दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री उदय सामंत, शिवसेना नेते संजय शिरसाठ यांच्यात चर्चा झाली. वर्षावर रात्री उशिरार्यंत तीन वाजेपर्यंत चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तब्बल साडेतीन तास चर्चा झाली.
श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती
वर्षावर देवेंद्र फडणवीस 11.30 ला दाखल झाले. त्यानंतर रात्री तीन वाजता देवेंद्र फडणवीस हे वर्षावरून बाहेर निघाले. देवेंद्र फडणवीस गेल्यानंतर श्रीकांत शिंदे वर्षावर दाखल झाले. यामुळे या चर्चेत कल्याण आणि ठाणे येथील जागेच्या विषयाची चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. श्रीकांत शिंदे यांना कल्याणऐवजी ठाणे येथून उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
रात्री अशा घडल्या घडामोडी
रात्री १०:३० ला संजय शिरसाठ वर्षावर
११:२३ च्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यावरुन वर्षावर दाखल
१२:०० च्या दरम्यान संजय शिरसाठ वर्षावरून बाहेर पडले
११:३२ च्या दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षावर दाखल
३:०० वाजता देवेंद्र फडणवीस वर्षावरून सागर निवासस्थानी रवाना
३:१० ला खासदार डॉ श्रीकांत शिंदे वर्षा निवासस्थानी दाखल











