हळूहळू अनेक जण बाहेर पडायला उत्सुक’, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात आज अजित पवार गटाचे बीडमधील नेते बजरंग बाप्पा सोनवणे यांनी प्रवेश केला. त्यांचा पुण्यात शरद पवार गटाच्या कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. गेल्या आठवड्यात आमदार निलेश लंके यांच्या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं. निलेश लंकेंनी बांध फोडला आहे. त्यामुळे आता पाणी व्हायला लागलं आहे. हळूहळू अनेक जण बाहेर पडण्यासाठी इच्छुक आहेत, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी केलं आहेत. तसेच जो आमदार शरद पवार यांची भेट घेतो त्याला अपात्रतेची भीती दाखवली जाते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. पण आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक आमदार शरद पवार गटात सहभागी होतील, असे संकेत जयंत पाटील यांनी दिले.

“बजरंग बाप्पा आपल्या पक्षात येणार अशी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु होती. मी सर्वांना सांगत होतो की, ते आपल्यातच आहेत. ते कधी गेले? पक्ष फुटल्यानंतरही बजरंग बाप्पा मला चार-पाच वेळा भेटले आहेत. फुटल्या-फुटल्या भेटल्या आहेत. विधान भवनात, माझ्या घरी चहा पिलाय. त्यामुळे ते कधी गेले असं मला वाटलंच नाही. पण तरीदेखील आज बजरंग बाप्पा यांच्या प्रवेशाचा सोहळा पार पडतोय. गेल्या आठवड्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. फक्त पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. निलेश लंके यांनी पुस्तक लिहिलंय. कोविड काळातला त्यांचा अनुभव. त्यांनी पुस्तक लिहिलं आणि इथे कार्यक्रम आयोजित करुन प्रकाशन पार पडलं”, असं जयंत पाटील म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

‘निलेश लंकेंनी बांध फोडला, पाणी व्हायला लागलंय’

“निलेश लंकेंनी बांध फोडलेला आहे. आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू अनेक जणं बांध फुटल्यामुळे उत्सुक आहेत. म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्त्व आहे”, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. “बजरंग बाप्पा शरद पवारांच्या बाजूला बसले आणि त्याचा साधा फोटो निघाला तरी त्याच्यावर अपात्रतेची कारवाई सुरु होते”, असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं. “तुमचं होऊ शकत नाही कारण तुम्ही विधीमंडळाचे सदस्य नाहीत. पण आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे”, असं जयंत पाटील बजरंग बाप्पा यांना उद्देशून म्हणाले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

‘एवढी मते बीडमध्ये आपल्या एकाही उमेदवाराला पडली नव्हती’

“इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर इथे आले. तुमचा उत्साह आम्ही दुपारपासून बघतोय. जेजुरींच्या खंडोबांचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा इथे आले आहेत. आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला उपस्थित आहात. बजरंग बाप्पांनी मागची लोकसभा निवडणूक लढवली. प्रचंड प्रयत्न केले. बजरंग बाप्पांना जेवढी मते पडली तेवढी मते त्यापूर्वी आपल्या पक्षाच्या कोणत्याही उमेदवाराला पडली नव्हती. सामान्य माणसाशी त्याच्या भाषेत बोलणं हा प्रयत्न बजरंग बाप्पांनी केला”, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

“मागचा प्रयत्न अयशस्वी झाला. थोडीशी नाराजी झाली. त्यानंतर आम्ही सर्व त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना गेलो. बीड जिल्हा नैसर्गिक संकटांना तोंड देत उभा आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने केले ते सर्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे. लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसाने लागत आहेत. एका बाजूने शक्ती, धनसंपत्ती, साधने मोठ्या प्रमाणात उभी आहेत. जनशक्ती दुसऱ्या बाजूने उभी आहे. मागची निवडणूक लढवली त्यावेळी शरद पवारांनी बजरंग बाप्पांना तिकीट दिलं, त्यावर त्यांनी विश्वास सार्थ ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज पुन्हा एकदा पक्षाच्या व्यासपीठावर शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा पक्षात कार्यरत होत आहेत. तरुण चेहऱ्यांना एकत्रित करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न आहे. या तरुणांना जिथे काम करण्याची इच्छा आहे तिथे संधी देण्याचा शरद पवारांचा मानस आहे”, असं जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.