महसूल खात्यातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना केंद्राकडून मिळाला IAS दर्जा; लोकसेवा आयोगाकडून पदोन्नती

0
24

मुंबई : महाराष्ट्रातील महसूल विभागातील 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीवन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली. महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील 12 ज्येष्ठ अधिकाऱ्यांना आज आयएएस कॅडर मिळाल्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. त्यामुळे, हे 12 अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नत केले आहेत. मी या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेत आज नवीन अध्याय जोडला गेला आहे, असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्रातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी यासर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राचा महसूलमंत्री म्हणून, महाराष्ट्र महसूल सेवेतील अधिकाऱ्यांना नेहमीच मी प्रोत्साहन देत असतो. त्यांच्या गुणांचे कौतुक मी जाहीरपणे तर करतोच पण विधिमंडळात त्यांची प्रशंसा करतो. उद्देश एकच, लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत जाव्यात. महसूल विभाग हा महाराष्ट्राचा प्रशासकीय कणा आहे; म्हणून या अधिकाऱ्यांनी आता आपली संपूर्ण क्षमता महाराष्ट्राच्या विकासासाठी उपयोगी आणावी अशी सदिच्छा व्यक्त करतो, असेही बावनकुळे यांनी या पदोन्नतीनंतर ट्विट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यातील अधिकाऱ्यांना मिळालेली शाबासकी म्हणजे आजची पदोन्नती होय, असेही त्यांनी म्हटले.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

दरम्यान, 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील रिक्त असलेल्या जागांवर या 12 नवीन आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे.

खालील अधिकाऱ्यांना मिळाली IAS पदोन्नती

विजयसिंह देशमुख

विजय भाकरे

त्रिगुण कुलकर्णी

गजानन पाटील

महेश पाटील

पंकज देवरे

मंजिरी मनोलकर

आशा पठाण

राजलक्ष्मी शहा

सोनाली मुळे

गजेंद्र बावणे

प्रतिभा इंगळे अशी आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहे