कर्वेरोड सार्वजनिक गणेश विसर्जन नियमित वेळेतच; सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समितीचे बहुमूल्य योगदान

• सलग 17व्या वर्षी ही कोथरूड गणेश उत्सव समितीचे मोलाचे योगदान • आकर्षक देखाव्यांनी कर्वे रोड सजला • दुटप्पी उड्डाणपूलामुळे लवकर विसर्जन शक्य • मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सर्व मिरवणुका पूर्ण

0

पुण्यातील गणेशोत्सव अन विसर्जन मिरवणुका प्रारंभापासून समारोप पर्यंत चर्चेचा विषय राहिला असला तरीसुद्धा याच पुण्यामध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या कर्वे रोड विसर्जन नियोजन समितीच्या बाबतीत मात्र कोथरूड भागातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्थापन केलेल्या कोथरूड गणेश विसर्जन नियोजन समिती यांनी सतराव्या वर्षी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे नियमित वेळेत अन हर्षोल्हासात गणेश महोत्सवाची सांगता करण्यात प्रशासनाला यश आले. पुण्यातील अन्य मार्गावरील विसर्जन मिरवणूक ही प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असताना कर्वे रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीला मात्र गेली सतरा वर्ष सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत असल्याने आज पर्यंत या मार्गावर कोणताही अनुचित प्रकार किंवा वादविवाद सारखी शिल्लक घटनाही न घडणे हे गणेश विसर्जन नियोजन समितीचे यशच मानावे लागेल.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

कोथरूड गणेश विसर्जन नियोजन समितीचे सदस्य उत्सवाच्या काळामध्ये सलग 10 दिवस विविध गणेश मंडळांना गाठीभेटी देत सलोख्याचे वातावरण तयार करत असल्याने विसर्जन नियोजनांमध्ये या सर्व गोष्टींचा कायमच फायदा होत आलेला आहे. याबरोबरच कोथरूड गावठाण, पौड रोड, कर्वे रोड, एरंडवणे, कर्वेनगर, केळेवाडी, विविध भागातील सर्वसमावेशक कार्यकर्ते या समितीमध्ये असल्यामुळे विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांची समजूत घालण्यासाठी सुद्धा या सर्वपक्षीय गणेश विसर्जन नियोजन समितीचा आजपर्यंत फायदा होत आला आहे. संपूर्ण गणेश उत्सवाच्या दरम्यान गणेश भक्तांना कोणतीही वैद्यकीय मदत आवश्यक असलेल्या नियोजन समितीच्या वतीने सुसज्ज रुग्णवाहिका सेवाही देण्यात आली होती 

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

गणेश विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर आणि मध्यरात्री बारा वाजेपर्यंत नियोजन समितीचे मान्यवर सदस्य राम बोरकर, संदीप मोकाटे, शिवाजी शेळके, मारुती वर्वे, अमोल डांगे, जयदीप पडवळ, अजय भुवड, किरण उभे, उमेश कंधारे, संतोष लांडे, वैभव जमदाडे, विनोद मोहिते, गजानन माझीरे, रामदास गावडे, अनिरुद्ध खांडेकर, उमेश भेलके, विशाल भेलके, श्रीकांत गावडे, मंदार बलकवडे, मंगेश खराटे, मंदार खरे, अनिल बिडलान, चेतन भालेकर, सुधीर धावडे, अण्णा गोसावी यांच्यासह गणेशभक्त पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

कोथरूड गणेश विसर्जन नियोजन समितीच्या नोंदीनुसार कर्वे रस्त्यावर विसर्जन मार्गात सहभागी झालेली सार्वजनिक मंडळे- 

  • लोकमत लॉ कोलेज रस्ता
  • समता मित्र मंडळ
  •  महाराजा मित्र मंडळ
  • छोटा जवान मित्र मंडळ
  • अचानक मित्र मंडळ पौडफाटा
  • बाल शिवाजी मित्र मंडळ ARAI रोड
  • अष्टविनायक मित्र मंडळ
  •  एरंडवणे मित्र मंडळ
  • लोकमान्य मित्र मंडळ
  • देशप्रेमी मित्र मंडळ
  • नवनाथ मित्र मंडळ
  • दशभुजा मित्र मंडळ
  • अचानक मित्र मंडळ
  • आदर्श मित्र मंडळ
  •  वंदेमातरम मित्र मंडळ
  • अष्टविनायक मित्र मंडळ
  •  क्रांतीवीर तरुण मंडळ
  • बाल तरुण मंडळ
  • कुमार युवक मंडळ
  • बाल कुमार मित्र मंडळ
  •  सिद्धीविनायक मित्र मंडळ
  •  गणेश नगर मंडळ
अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती