मॉडर्न विकास मंडळाचे द्विदशकी “मोफत तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र” नामदार चंद्रकांत दादांच्या हस्ते उद्घाटन ५७ रुग्णांसाठी ठरलं जीवनदायी

0

पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मार्ग लक्ष्मी रोड म्हटलं की पुण्यातील सर्वोच्च गर्दी असलेला भाग म्हणून ओळख आहेच परंतु या भागातील गणेश भक्तांना उत्सवाच्या दरम्यान काही तातडीची वैद्यकीय गरज देण्याच्या उद्देशाने वीस वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या ‘मोफत वैद्यकीय सेवा केंद्र’ सलग 20 वर्षाची सेवा यंदाही गणेश भक्तांसाठी विघ्नहर्ताच ठरली. लक्ष्मी रस्त्यावर असलेली प्रचंड गर्दी ढोल ताशांच्या आवाज डीजेचे आवाज यासह गर्दीमुळे होणारे अपघात यासाठी मॉडर्न विकास मंडळ पुणे व स्मार्ट पुणे फाउंडेशन च्या सेवेमुळे शेकडो गणेश भक्तांना याचा फायदा झाला. मॉडर्न विकास मंडळ, पुणे व स्मार्ट पुणे फाऊंडेशन या संस्थेच्यावतीने सलग २० व्या वर्षी “गणेश विसर्जन” मिरवणुकीच्यावेळी लक्ष्मी रस्त्यावरील “विजय टॉकीज चौक” येथे गणेश भक्तांसाठी “मोफत तातडीचे वैद्यकीय सेवा केंद्र” दि. ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. ते १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८.०० वा. पर्यंत कार्यरत होते.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

या मोफत तातडीचे वैद्यकीय सेवेचा लाभ ५७ रुग्णांनी घेतला. यामध्ये चक्कर येऊन पडणे, डी हायड्रेशन, हाताला पायाला जखमा, गुदमरुन दम लागणे, रक्तदाब कमी होणे, गुलालाच्या अॅलर्जीमुळे अॅक्युट दमाच्या रुग्णांना ऑक्सीजन लेवल कमी होणे, अशा प्रकारच्या रुग्णांना सेवा देण्यात आली.

या वैद्यकीय सेवेकरीता डॉ. संदीप बुटाला यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रियांक जावळे, डॉ. तुषार जगताप, डॉ. प्रसाद आंबीकर, डॉ. धर्मेंद्र शहा, डॉ. राजेंद्र खेडेकरे, डॉ. मनिषा जाधव, डॉ. चिल्ले यांनी रुग्णाची तपासणी करुन तातडीचे उपचार केले. यावेळी दोन रुग्णांना (१) हॉटेल दुर्वांकुर जवळ उलटी व चक्कर येऊन पडलेले तसेच (२) प्रचंड पोटात दुखणे (अॅक्युट अॅबडामेन) पुन्हा हॉस्पिटल येथे रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले. या वैद्यकीय सेवा केंद्राचे उद्घाटन मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीपजी खर्डेकर, मा. अजय खेडेकर, मा. प्रशांत हरसुले, मा. दिलीप उंबरकर, मा. अनिल बेलकर, दादा खत्री, प्रमोद कोंढरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

सौ. मनिषा बुटाला, नानासाहेब ओव्हाळ बळीराम भडकवाड, योगेश मराठे, सुयश बुटाला, शत्रुघ्न ओझरकर, भरत मराठे, विलास मोहोळ, मनिष कदम, रामभाऊ भगत, पांडुरंग शिंदे, आकाश मालपोटे, स्वप्निल खामकर यांनी विशेष योगदान दिले.