संतोष देशमुख हत्याप्रकरणी मोठी अपडेट; कल्याणमधून उसाच्या गाड्यावर काम आणखी एकाला उचलले, लोकेशनची माहितीचा संशय

0

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येत आहे. या हत्या प्रकरणाचा तपासाची सूत्रे एसआयटीने हाती घेतल्यानंतर तपास कामाला वेग आला आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना मदत करणाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर शनिवारी सकाळीच एसआयटीने सुदर्शन घुले, सुधीर सांगळ या गेल्या अनेक दिवसापासून फरार असलेल्या दोघाला ताब्यात घेतले. त्यांनतर सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन आरोपींना देणाऱ्या मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणेला देखील शनिवारी सकाळी कल्याणमधून पोलिसांनी उचलले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. यापूर्वीच जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले यांना अटक केली आहे. सध्या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे लोकेशन आरोपींना देणाऱ्या मस्साजोग गावातील सिद्धार्थ सोनवणेला पोलिसांनी उचलले. सोनवणेला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा कल्याण (मुंबई) येथून एका उसाच्या गाडीवर काम करत असताना मुसक्या आवळल्या.

संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सिद्धार्थ हा काही दिवस गावातच होता. मयत देशमुख यांच्या अंत्यविधीला देखील तो उपस्थित होता. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस सुरुवातीला आरोपींचा तपास करत असताना त्यांनी आपले लक्ष गावातच केंद्रित केलेले होते. अपहरण करण्यापूर्वी कोणीतरी जवळचा व्यक्ती लोकेशन देत असावा असा संशय पोलिसांना होता. त्यामुळे त्याचा शोध पोलीस यंत्रणेकडून घेण्यात येत होता. लोकेशन देणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याची कुणकूण सिद्धार्थला लागताच तो गावातून फरार झाला होता.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

15 दिवसापासून होता फरार

या घटनेच्या दोन दिवसानंतर सिद्धार्थ गावातून फरार झाला. सिद्धार्थ फरार झाल्यानंतर मुंबईत लपून बसला होता. त्याने या काळात वेगवेगळी पाच सिम कार्ड देखील वापरली होती. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना (Police) त्याचे मुंबईतील लोकेशन मिळताच त्या ठिकाणी त्यांनी सापळा लावला. एका मोकळ्या पटांगणात उसाच्या गाड्यावर काम करत असतानाच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आता पूर्णपणे उलगडा होण्यास मदत होणार आहे.