मविआचा प्लान बी ‘चैत्यभूमी’वर राहुल गांधीचे अभिवादन असे ठरलं जागावाटप; उद्धव ठाकरेंनी नावही जाहीर केलं!

0
1

लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या आठ ते नऊ जागांवर तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची आज पुन्हा एकदा आज बैठक झाली. यावर अंतिम निर्णय होऊन 17 मार्च नंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे. लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या आठ ते नऊ जागांवर तिढा अद्यापही सुटलेला नाही. त्यावर चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीची आज पुन्हा एकदा आज बैठक झाली. यावर अंतिम निर्णय होऊन 17 मार्च नंतर जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी आघाडीतील नेते सकारात्मक असून दिलेल्या प्रस्तावावर वंचित आघाडीच्या भूमिकेची प्रतिक्षा आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

वंचित बहुजन आघाडी शिवाय महाविकास आघाडीच्या जागावाटप झाल्यास शिवसेना ठाकरे पुन्हा एकदा 23 जागांवर ठाम असणार आहे. तर काँग्रेस पक्षाला 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा असा फॉर्मुला असणार आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी संदर्भात भूमिका अजूनही स्पष्ट नसल्याने महाविकास आघाडीने आपला प्लान बी तयार ठेवला आहे.

६ हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापून राहुल गांधी मुंबईत येत आहेत. उद्या होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेच्या तयारी बाबत आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. उद्या संध्याकाळी पाच वाजता राहुल गांधी हे चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. वंचित बहुजन आघाडी सुद्धा राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आमच्या महा विकास आघाडी मध्ये कोणताही वाद नाहीये, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

उद्धव ठाकरेंनी नावच केलं जाहीर

उद्धव ठाकरे यांनी आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरे यांनी आज उरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे ग्रुपवर जोरदार हल्ला चढवला. अरविंद सावंत इथून पुन्हा खासदार होणारच, असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यावर नाना पटोले यांनीही अरविंद सावंत आमचे दक्षिण मुंबईतून लोकसभेचे उमेदवार आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.