प्रतिभावंत कवी बी. टी. कदम मितभाषी सोज्वळ मनाचे कवी परंतु त्यांच्या शब्दाला धार होती – भार्गवदास जाधव

0
1

मुंबई दि. ३० (रामदास धो. गमरे) “सम्यक कोकण कला संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष, कोकनरत्न बी. टी. कदम हे मितभाषी व सोज्वळ मनाचे कवी होते परंतु त्यांच्या काव्यास धार होती, त्यांचे शब्द रसिकांच्या काळजात घर करून रहात, प्रतिभाशाली लेखनशैलीने आपला ठसा उमवट त्यांनी नावलौकिक प्राप्त केला.” असे गौरवोद्गार बी. टी. कदम यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात बोलत असताना भार्गवदास जाधव यांनी काढले.

सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने माजी अध्यक्ष बी. टी. कदम यांचा दहावा स्मृतिदिन भार्गवदास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली जैतवन बुद्ध विहार, अण्णाभाऊ साठे हौसिंग सोसायटी येथे संपन्न झाला.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

सदर प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष भगवान साळवी व चिंतामण जाधव यांनी ज्योत प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात केली, सहसचिव मुकुंद तांबे यांनी भारदस्त आवाजात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर संस्थेचे माजी महासचिव राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे यांनी प्रभावीशैलीत प्रास्ताविक सादर करताना सदर संस्थेचा उगम कसा झाला त्यात बी. टी. कदम यांचे असलेले मोलाचे योगदान, संस्था चालविण्यासाठी घेतलेले अपार कष्ट व अनेक कलावंत घडवण्याचे केलेले महत्कार्य, संस्था उभी करताना राबविलेले सामाजिक कामे यावर प्रकाशझोत टाकला व बी. टी. कदम यांनी संस्थेची मुहूर्तमेढ करून आज तिचे विशाल वृक्षात रूपांतरण झाले ज्याच्या फांदीफांदीवर अनेक नवोदित कलावंतांचे थवे स्वतःचे घरटे बांधत आहेत, अनेक संस्था आज या विशाल वृक्षाच्या छायेखाली सामावल्या जात आहेत असे नमूद करून बी. टी. कदम यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

अधिक वाचा  बुद्धीदेवता गणरायाला शालेय साहित्य आरस; मोरया मित्र मंडळाचा उपक्रम आदर्शवत : पोलीस निरीक्षक काइंगडे

सदर प्रसंगी कार्याध्यक्ष भगवान साळवी, चिंतामण जाधव, माजी चिटणीस चंद्रमनी घाडगे, खजिनदार सुभाष सावंत, बँजोमास्टर रोटकर, गोविंद म्हशीलकर यांचे चिरंजीव जगतपाल म्हशीलकर, माजी चिटणीस सुधाकर मर्चंडे, मिलिंद मर्चंडे, मंगेश जाधव, दर्शन जाधव आदी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याप्रत्येकाने बी. टी. कदम यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच ६ नंबर गेट येथे ज्यांच्या घरी सम्यक कोकण संस्था या संस्थेचा जन्म झाला असे संस्थेचे पेटीमास्टर यशवंत जाधव यांचा ही स्मृतिदिन त्याच दिवशी असल्याने त्यांना ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सरतेशेवटी हा कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने पार पाडण्यासाठी व आदर्शांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित सर्वांचे आभार मानून सहसचिव मुकुंद तांबे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं मराठे पुन्हा तहात हरले? शासन निर्णयावर कोण कोण काय म्हणालं?