काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या विरोधामध्ये भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये गेली पंधरा वर्षे सलग निष्क्रिय कारभारामुळे विरोधी लाट तयार झाली असून सर्वसामान्य नागरिक किरण दगडे पाटील यांना पसंती वाढत आहे. भोरमध्ये ठराविक लोकांसाठीच विकास कामे झाल्याने सर्वसामान्य नागरिक प्रचंड नाराज असून विरोधात सुप्त लाट तयार झालेली असून ती आता मतपेटी मधून व्यक्त होणार आहे असे येथील अबाल वृद्ध तसेच महिलांनी किरण दगडे पाटील यांच्या बैठकीमध्ये मत व्यक्त केले.






भोरच्या हद्दीमधून गेलेल्या महामार्गाचे अर्धवट काम अन् चुकीच्या ठिकाणी झालेले बायपास मार्ग तसेच या महामार्गावर झालेले अनेक अपघात तसेच टोल नाका असे अनेक प्रश्न थोपटे यांना सोडविता आलेले नाही. भोर तालुक्यामध्ये अनेक दुर्गम ठिकाणी आजही रस्ते लाईट पाणी दवाखाना या मूलभूत सुविधाही नसल्याची खदखद नागरिक जाहीर व्यक्त करत आहेत. तालुक्यातून गेलेला मुंबई बेंगलोर महामार्ग हा मृत्यूचा सापळा झालेला असून या महामार्गावर असंख्य अपघात झालेले आहेत त्या अपघातांना कारणीभूत ठरलेल्या संबंधित ठेकेदारावर आमदारांनी योग्य ती कारवाई करण्यास शासनाकडे म्हणावा तेवढा पाठपुरावाही केलेला नाही देखाव्यापूर्तीच आंदोलने केली त्यामुळे या महामार्गाचे प्रशासन हे निगरगट्ट झालेले आहे.
आतापर्यंत योग्य नेतृत्व मिळत नव्हते ते आता किरण दगडे पाटील यांच्या रूपाने आम्हाला मिळालेले असून आम्ही आमच्या मनातील सर्व काही भावना त्यांना सांगितलेल्या असून या निवडणुकीमध्ये संग्राम थोपटे हे निवडून येणार नाहीत त्याचे रूपांतर आम्ही मतपेटीतून करणार असून योग्य नेतृत्वच यापुढे भोरचे नेतृत्व करेल आणि आम्ही काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मतेही देणार नाही असे महामार्ग लगतच्या गावांमध्ये असलेले किरण दगडे यांना नागरिक जाहीर सांगत आहेत.
संपूर्ण मतदार संघात मुंबई बेंगलोर महामार्गाचे काम गेले वर्षानुवर्षे अर्धवट असून अनेक ठिकाणी जीव घेणे खड्डे आहेत तरीही संबंधित ठेकेदारांकडून योग्य पद्धतीने भरले जात नाहीत. प्रत्येक शनिवार रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी खेड शिवापुर टोल नाका दोन दोन तास वाहतूक कोंडी मध्ये असते. असंख्य अपघातांना कारणीभूत असलेल्या महामार्गाच्या प्रशासनावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झालेली नाही.













