खडकवासला पाच वर्षांतच 19,031 कोटी रुपयांचे प्रकल्प: आमदार तापकीर यांची सर्वांगीण विकासाची यशोगाथा

0

खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार आणि भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार भिमराव तापकीर यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघातील विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्यांच्या या कार्यकाळात ग्रामीण आणि शहरी भागांना समतोल पद्धतीने विकासाची गंगा मिळवून देत जनतेशी आपुलकीचे बंध निर्माण केले आहेत.

गेल्या पाच वर्षांत 19,031 कोटी रुपयांचे प्रकल्प खडकवासला मतदारसंघात प्रगतीपथावर आणले गेले. गोगलवाडी ते घेरा सिंहगड, खडकवासला ते आंबी, पानशेत-जांभळी यांसारख्या ग्रामीण भागांपासून वारजे, शिवणे, उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे, एनडीए, अहिरे, खडकवासला, कीरकटवाडी, नांदोशी, सणस नगर, नांदेड, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वडगाव खुर्द, सिंहगड रोड, सनसिटी, माणिक बाग, कर्वेनगर, बावधान-भुसारी, कोथरूड, भारती विद्यापीठ, कात्रज, बालाजी नगर, बिबेवाडी, धनकवडी, राजीव गांधी नगर या भागांमध्ये नागरी आणि पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे.

अधिक वाचा  नगराध्यक्षांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत आनंदाची बातमी, सदस्यत्व व मताधिकार सरकार हा अध्यादेश काढणार

महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग, चांदणी चौक उड्डाणपूल, खडकवासला पश्चिम रिंग रोड प्रकल्प, नवले पूल ते कात्रज रस्त्याचे सहापदरीकरण, वारजे ते माळवाडी मुठा नदीवरील नवीन पूल, स्वामीनारायण मंदिर ते नऱ्हे जंक्शन उड्डाणपूल, सनसिटी रोड (सिंहगड रोड) नदीवर पुल, खडकवासला फुरसुंगी बंदिस्त पाण्याचा भुयारी मार्ग यासाठी देखील २२०० कोटी अशा अनेक योजनांचा समावेश आहे. सिंहगड किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी जिल्हा नियोजन आणि पर्यटन विभागांकडून विशेष निधी, खाजगी सोसायट्यांच्या सीमा भिंती करिता ४८ कोटी, तसेच खाजगी सोसायट्या मध्ये सोलर प्रकल्प राबविण्यासाठी कोट्यावधीचा निधी, नगरविकास विभाग व ग्रामविकास विभागाकडून निधीतून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्याप्रमाणात निधी मंजूर करण्यात तापकीर यांना यश आले आहे.

अधिक वाचा  पवारांना सोडताच प्रशांत जगतापांचा पक्ष अन् 2029 चे मोठे लक्ष्य ठरल; मुंबईत यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश?

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 32 गावांमधील मालमत्ता कराचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रभावीपणे पाठपुरावा केला. ग्रामपंचायतीच्या तुलनेत आकारल्या जाणाऱ्या जाचक कराला स्थगिती मिळवून त्यांनी जनतेला दिलासा दिला.

आज बावधन, कोथरूड, रामनगर आणि भुसारी कॉलनी येथे प्रचार करण्यात आला. खडकवासला मतदारसंघातील विकासाच्या या प्रवासात सन २०१७ ते २०२२ याकाळात लोकप्रतिनिधी राहिलेले राहिलेले दिलीप वेडे पाटील, अल्पना वर्पे, किरण दगडे, श्रद्धा प्रभुणे, सुशील मेंगडे, वृषाली चौधरी, राजाभाऊ बराटे, दिलीप बराटे, दिपाली धुमाळ, हरिदास चरवड, नीता दांगट, राजश्री नवले, राजाभाऊ लायगुडे, श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, ज्योती गोसावी, मंजुषा नागपुरे, दत्तात्रय धनकवडे, राणी भोसले, मनीषा कदम, प्रकाश कदम, वर्षा तापकीर, अश्विनी भागवत, युवराज बेलदरे, अश्विनी पोकळे, जयश्री भुमकर, जयश्री पोकळे, उषा नाणेकर, अनिरुद्ध यादव, सचिन दांगट, गंगाधर भडावळे, वैभव मुरकुटे, बाळा टेमकर यांचा उल्लेख करण्यात ते विसरले नाहीत यातूनच त्यांची सर्वसामान्य नागरिक यांच्यासोबत पक्ष निष्ठा दिसून येते.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

“खडकवासल्याचा सर्वांगीण विकास हेच माझे प्राधान्य आहे,” असे सांगत तापकीर यांनी चौथ्या टर्मसाठी विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने प्रचारात सामील झाले आहेत. खडकवासल्याच्या विकास गौरवासाठी तापकीर यांचा चौथा विजय निश्चीत असल्याचा विश्वास मतदारसंघातील जनतेने व्यक्त केला आहे.