मुळ बीड जिल्ह्यातील असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येथील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली. फलटणमधील उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून संपदा मुंडे या कार्यरत होत्याकामात अत्यंत प्रामाणिक असून पुढील शिक्षणासाठी त्या अभ्यास देखील करत होत्या. मात्र, अचानक त्यांनी एक नोट हातावर लिहित आयुष्याचा धक्कादायक असा शेवट केला. संपदा मुंडेंच्या आत्महत्येनंतर विविध खुलासे होताना दिसत आहेत. पीएसआय गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचे त्यांनी नोटमध्ये लिहिले. प्रशांत बनकर या व्यक्तीच्या नावाचा उल्लेखही त्या नोटमध्ये करण्यात आला असून प्रशांत बनकर याच्या घरात पीडित संपदा मुंडे या किरायाने राहत.






फलटणमध्ये किरायाचे घर असताना देखील संपदा मुंडे यांनी दोन दिवसांसाठी हॉटेल बुक का केले? असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत. संपदा मुंडेंसह आरोपींचा फोन पोलिसांच्या ताब्यात आहे. संपदा मुंडे आरोपी पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्या संपर्कात होती. दररोज त्यांच्यामध्ये बोलणे व्हायचे हे स्पष्ट होत असतानाच साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक गोष्टींवर भाष्य केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्पष्टपणे म्हटले की, पीडित डॉक्टरचे आणि आरोपींचे काहीतरी संबंध होते, कारण ती सतत दोघांच्याही संपर्कात होती. मोबाईलपेक्षाही एक महत्वाची गोष्ट पोलिसांच्या हाती लागलीये. ती म्हणजे महिला डॉक्टर संपदा मुंडे यांची डायरी. संपदा मुंडे यांना डायरी लिहिण्याची आवड होती. संपदा मुंडे या डायरीमध्ये पोस्टमार्टेम नोटसोबतच खासगी आयुष्याबद्दलही लिहित.
आता ही डायरी पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतली असून त्यामधून काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. संपदा मुंडे यांच्यासोबत नक्कीच नेमके काय घडत होतं हे या डायरीमधून स्पष्ट होऊ शकते. एक प्रकारचा मोठा पुरावाच पोलिसांच्या हाती लागला म्हणावे लागेल. पीडितेला न्याय मिळण्यासाठी एसआयटीची स्थापना करा, अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केलीये. कारण या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचेही बघायला मिळतंय.













