कै. श्रीमती चतुरा संतोष चव्हाण(खोमणे) वय वर्ष 42 यांचे अल्पशा आजाराने दुखःत निधन झाले. ताईच्या अचानक जाण्याने मित्र परिवार सून्न झाला तिच्या पश्चात तिच्या मुलांचे काय? काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचेही निधन() झाले होते, त्यांना दोन मुली व एक लहान मुलगा आहे.






आता या मुलांचे मातृछत्रही हरपले त्यामुळे आपण काही मदत करू यात का? आपली भगिनी अचानक आपल्यातून गेली. आपणही समाजाचे काही देणे लागतो या संकल्पनेतून श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेच्या 1999 च्या 10 वीच्या बॅचने मैत्रीचे नाते जपत मैत्री जिवंत ठेवत मांडवगण फराटा येथील श्री.रामदास तात्या खोमणे यांची कन्या कै.श्रीमती चतुराताई चव्हाण/खोमणे यांच्या मृत्यू नंतर ‘फुल नाही फुलाची पाकळी’ म्हणून त्यांच्या मुलाच्या नावे पुढील शालेय शिक्षणासाठी पिडीसीसी बँक मांडवगण फराटा येथे 90 हजार रुपयांची मुदत ठेव पावती ठेवली आहे.
या बँचने एक वर्षांपूर्वी याच वर्ग भगिनीच्या मुलीच्या विवाह प्रसंगी वर्गणी करून 20 हजार रूपयांची मदत केली होती तसेच बँचने श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांनसाठी प्रा वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. असे अनेक सामाजिक उपक्रम या बँचच्या वतीने राबविले जातात.
1999 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थीं अभिषेक दरेकर, मनोहर फराटे, अमोल जगताप, सागर फराटे, संदीप गायकवाड, अभिजीत जगताप, सचिन घाडगे, सुधाकर जगताप, नाना लगड, हनुमंत भोसले, संदिप नागवडे, काका परदेशी, बाबा थोरात, गणेश फराटे, प्रमोद कदम, जावेद आत्तार, गोरख राऊत, स्वप्नील धोका, आप्पा संकपाळ, राहूल कुंभार, शाम ढमढेरे, अनिता फराटे, वैशाली फराटे, अर्चना हांडे, स्वाती जगताप, अश्विनी नागवडे, सुवर्णा पाचपुते, शैला फराटे, कल्पना फराटे, अर्चना फराटे, स्वाती चकोर, तसेच सर्व ग्रुपचे सदस्य एकत्र येत मदत केली.













