सुरजनगर ते राष्ट्रीय महामार्गची रस्ता रुंदी 30 मीटर करा; नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांची आयुक्तांकडे मागणी

0

पुणे महापालिकेच्या विकासाकडे आराखड्यामध्ये जुन्या हद्दीत कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते शांतीबन चौक रस्ता सध्या 30 मीटर रुंदीचा विकसित केला असला तरी सुद्धा महापालिकेच्या समाविष्ट 23 गावांच्या विकास आराखड्यामध्ये हाच रस्ता व्यावसायिक हितार्थ महामार्गापर्यंत 15 मीटर दाखवण्यात आला असून तात्काळ संबंधित रस्ता 33 मीटरचा करण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटीलयांनी आयुक्त पुणे महापालिका यांच्याकडे केली आहे.

पुणे शहरातील बांधकाम नियमावली बदल झाल्यानंतर या भागामध्ये वाढती लोकसंख्या व नागरी वस्त्यांचा मोठा विस्तार लक्षात घेता, भविष्यात होणारी वाढती वाहतूक सुरळीतपणे हाताळण्यासाठी हा रस्ता 30 मीटर रुंदीने विकसित करणे अत्यावश्यक आहे. मुळात सुरुवातीपासून 30 मीटरने असलेला हा रस्ता कोणाच्या हितार्थ 15 मीटर करण्यात आला आहे हा मोठा यक्ष प्रश्न आहे. कोथरूड भागातील मुख्य पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी विभाजित करण्यासाठी या रस्त्याचा पूर्णपणे वापर होण्याची शक्यता असतानाही रुंदी कमी ठेवण्यामागे कोणाचे हित आहे याची चौकशी करून हा रस्ता 30 मीटर विस्तारीत करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोथरूड परिसरातील वाढती लोकवस्ती व पौडरस्त्यावरील अतिरिक्त वाहनांचा ताण टाळण्यासाठी व आगामी काळात होणारी गंभीर वाहतूक कोंडीही या रस्त्याची रुंदी 30 मीटर केल्यास टाळता येईल.

अधिक वाचा  राज्यात सत्ता बदलाचे केंद्र मुंबई पुणे ठरणार? महाराष्ट्रात आता 2 नाही 3 आघाड्या? 

कोथरूड मधील नागरिकाच्या दैनदिन प्रवासात या रस्त्याचा वापर केला जात असून रुंदी कमी असल्याने उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच या भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असून विकास आराखड्याप्रमाणे कर्वे पुतळा ते राष्ट्रीय महामार्ग असा एक सलग 30 मीटरचा रस्ता अस्तित्वात आल्यास नागरिकांची मोठी सोय होईल. यासाठी शांतिबन चौक एकलव्य कॉलेज ते राष्ट्रीय महामार्ग हा सपूर्ण रस्ता 30 मीटर रुदीने विकसित करण्यात यावा अशी विनती माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या वतीने लेखी निवेदनामार्फत करण्यात आली आहे.