नौशाद शेख महागडा क्रिकेटपटू ही देशांतर्गत क्रिकेटमध्ये पहिली गोष्ट; रोहित पवारांची घोषणा

0
1

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी पुण्यात आज मोठी घोषणा केली आहे. पुण्यातील गहुंजे मैदानात एमपीएलचा लिलाव पार पडला. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी पुढील वर्षी महिलांची MPL स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा केली. या स्पर्धेत चार संघांचा सहभाग असेल, असे त्यांनी सांगितले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथमच कोणत्याही राज्य क्रिकेट संघटनेकडून महिला प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात येणार आहे.

एमपीएलसाठी मंगळवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात नौशाद शेख हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला. लिलाव पार पडल्यानंतर रोहित पवार यांनी संवाद साधला. एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, लिलावात खेळाडूंना मिळालेल्या बोलीवरून त्यांचा दर्जा अधोरेखित केला जाऊ नये. आमच्यासाठी प्रत्येक खेळाडू अमूल्य आहे. एमपीएलमुळे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. यामुळे भविष्यात आयपीएल आणि अन्य भारतीय संघांतून महाराष्ट्राचे अधिक खेळाडू खेळताना दिसतील असा विश्वास वाटतो. एमपीएलमधून मिळणारा निधी हा क्रिकेटच्या प्रोत्साहनासाठीच वापरला जाणार आहे. यामुळे एमसीएच्या कार्यकक्षेतील २१ जिल्ह्यांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असेही रोहित पवार म्हणाले.

अधिक वाचा  राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 14 निर्णय; मुंबई- ठाणे नविन मेट्रो मार्गिका, पुणे-लोणावळा हा निर्णय, सर्व जाणून घ्या! 

लिलावप्रक्रिया पार –

लिलावासाठी ३०० हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये अ गटात रणजी करंडक खेळाडूंचा समावेश होता. त्यांची ६० हजार ही पायाभूत रक्कम निश्चित करण्यात आली होती. १९ वर्षांखालील आणि ब गटातील खेळाडूंसाठी ४० हजार रुपये किंमत ठरविण्यात आली होती. क गटासाठी २० हजार रुपये ही पायाभूत किंमत होती. खेळाडूंच्या खरेदीसाठी सहाही फ्रॅंचाईजींना २० लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली होती. फ्रॅंचाईजींना संघात १६ खेळाडूंचा समावेश करायचा होता. यामध्ये १९ वर्षांखालील दोन खेळाडू असणे अनिवार्य होते. १९ वर्षांखालील गटातून सचिन धस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोल्हापूर संघाने सचिनसाठी १ लाख ५० हजाराची बोली लावली.

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

एमपीएलमधील सहा संघ कोणते ?

सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ पुणेरी बाप्पा

(ऋतुराज गायकवाड संघाचा आयकॉन)
पुनित बाल समुहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स,

ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल नाशिक टायटन्स,

वेंकटेश्वरा इंडस्ट्रिजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज,

जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस,
कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स अशा नावाने ओळखला जाईल.