भयानक!पुण्यात गुंडाराज सुरूच? चक्क पोलिसांसमोरच 22 वर्षांच्या तरूणीला जिवंत जमीनीत गाडण्याचा प्रयत्न

0

जमीनीच्या वादातून 22 वर्षांच्या तरूणीला जमीनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात ही अतिशय भयानक आणि नृशंस घटना घडल्याचे उघडकीस आले. ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या मदतीने तरूणीला जमीनीत गाडण्याचा प्रयत्न झाला. जमीनीचा बेकायदा ताबा घेण्यासाठी आलेल्या जमावाने हे कृत्य केलं. यावेळी जमावासोबत पोलिसही आल्याचा आरोप पीडित तरूणीने केला. यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरूणी कोंढवळे गावातील असून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पीडित तरूणी आणि तिच्या आईने केला. न्यायप्रविष्ट असलेल्या जमीनीचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्यासाठी आलेल्या लोकांना त्या तरूणीने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तिच्या अंगावर माती टाकली आणि तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ते नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असता, तरूणीचा त्यांच्याशी वाद झाला. त्यानंतर पोलिसांसमोरच ही घटना घडली. व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये ती तरूणी कंबरेपर्यंत मातीत गाडली गेल्याचेही दिसत आहे. अखेर तिच्या कुटुंबियांनी मदतीसाठी धाव घेत तिला बाहेर काढले. याप्रकरणानंतर तरूणीने वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर तक्रार केली आहे. त्यानंतर राजगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसंच, या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

तुम्हाला सगळ्यांना गाडून टाकू, आरोपींनी दिली धमकी

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

आम्ही शेतात काम करत होते, तेव्हा तिथे १० -१२ गुंड आले होते. त्यांनी शेतात घुसायचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांच्या ट्रॅक्टरच्या समोर जाऊन उभे राहिलो, पण त्यांनी आम्हाला तेथून जबरदस्तीने बाजूला ढकललं. त्यानंतर त्यांनी माझ्या बहिणीलाही बाजूला ढकलून दिलं आणि तिच्या संपूर्ण अंगावर माती टाकून दिली. काहीच दिसत नव्हतं. नंतर एका व्यक्तीने तिच्या तोंडावरची माती काढली, मग ती आम्हाला दिसली आणि तिचा आवाज ऐकून तिथे धाव घेतली. ती जमीनीत गाडली गेली होती. तिला कसंबसं आम्ही बाहेर काढलं, असा भयानक अनुभव पीडित तरूणीच्या बहिणीने सांगितला. ही जमीन तुम्हाला देणार नाही, काय करायचं ते करा. इथे तुम्हाला सगळ्यांना गाडून टाकून, अशी धमकी त्या गुंडानी दिली, असेही तिने सांगितलं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा